Jio युजर्सची मज्जाच मजा! ‘या’ रिचार्ज प्लॅनवर मिळतोय Extra इंटरनेट डेटा, Unlimited बेनिफिट्स देखील उपलब्ध। Tech News 

Jio युजर्सची मज्जाच मजा! ‘या’ रिचार्ज प्लॅनवर मिळतोय Extra इंटरनेट डेटा, Unlimited बेनिफिट्स देखील उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

रिलायन्स Jio च्या लोकप्रिय प्रीपेड प्लॅन्समध्ये अतिरिक्त डेटा मोफत

रिलायन्स Jio च्या 399 रुपये आणि 219 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत.

Jio च्या 61 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत डेटा मिळणार आहे.

रिलायन्स Jio आपल्या युजर्सना खुश करण्यासाठी नेहमी काही ना काही भारी ऑफर्स आणत असते. ताज्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या काही प्रीपेड प्लॅनमध्ये बोनस डेटा देत आहे. जर तुम्हीही Jio यूजर असाल आणि नवीन रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. खरं तर, रिलायन्स Jio च्या 399 रुपये आणि 219 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत. या प्लॅन्समध्ये अतिरिक्त डेटा देऊन कंपनीने या प्लॅन्सना विशेष बनवले आहे.

Jio चा 219 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio चा 219 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. विशेष म्हणजे Jio या प्लॅनसह 25 रुपयांचा मोफत डेटा देत आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना 2GB बोनस डेटा मिळतो. विशेष लाभांसह संपूर्ण वैधतेदरम्यान प्लॅनमध्ये एकूण 44GB डेटा मिळतो.

jio plans
Jio plans

प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud यांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनचे ग्राहक Jio च्या अमर्यादित 5G डेटा ऑफरसाठी देखील पात्र आहेत.

Jio चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS आणि दररोज 3GB डेटा मिळतो. याशिवाय, 399 रुपयांच्या प्लॅनसह, जिओ 61 रुपयांचा मोफत डेटा देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना 6GB बोनस डेटा मिळत आहे. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण 90GB डेटा मिळेल.

प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त बेनिफिट्समध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud यांचा समावेश आहे. या प्लॅनचे ग्राहक Jio च्या अमर्यादित 5G डेटा ऑफरसाठी देखील पात्र आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo