itel Zeno 10: नवा बजेट स्मार्टफोन Amazon वर सूचिबद्ध! मिळेल iPhone सारखे फीचर, किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी 

itel Zeno 10: नवा बजेट स्मार्टफोन Amazon वर सूचिबद्ध! मिळेल iPhone सारखे फीचर, किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

itel चा नवा itel Zeno 10 फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.

itel Zeno 10 साठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह करण्यात आला आहे.

हा फोन भारतात पुढील वर्षी जानेवारी 2025 मध्ये लॉन्च केला जाईल.

itel Zeno 10: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता itel चा नवा itel Zeno 10 फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनबद्दल डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह करण्यात आली आहे. Amazon लिस्टिंगद्वारे फोनच्या डिझाईन आणि काही प्रमुख फीचर्सबद्दल माहिती उघड झाली आहे. लक्षात घ्या की, फोनच्या मागील बाजूस स्टायलिश पॅटर्न डिझाइन दिले जाईल, जे या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणार आहे. हा फोन कंपनी बजेट रेंजमध्ये सादर करणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर-

Also Read: Best 5G Smartphones Under 9000: कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्टफोन्स उपलब्ध! Lava, Redmi फोन्स समाविष्ट

itel Zeno 10 ची भारतीय लाँच डेट

वर सांगितल्याप्रमाणे, itel कंपनीने समर्पित मायक्रोसाइट Amazon वर itel Zeno 10 फोन लाईव्ह केला आहे. हा फोन भारतात पुढील वर्षी जानेवारी 2025 मध्ये लॉन्च केला जाईल, Amazon लिस्टिंग द्वारे समोर आले आहे. मात्र, सध्या कंपनीने फोनच्या लाँच तारखेची पुष्टी केलेली नाही. मात्र, फोनबद्दल इतर माहिती उघड झाली आहे.

itel zeo 10 amazon listing

वर सांगितल्याप्रमाणे, फोनची डिझाईन, अपेक्षित किंमत आणि इतर फीचर्स उघड झाले आहेत. होय, लिस्टिंगवर विश्वास ठेवला तर, कंपनी हा फोन Rs 5,xxx च्या किमतीत लाँच करणार आहे. अशा परिस्थितीत या फोनची किंमत 6000 रुपयांपेक्षा कमी असेल, हे स्पष्टपणे स्पष्ट झाले आहे.

itel Zeno 10 चे फीचर्स आणि स्पेक्स

Amazon लिस्टींगनुसार, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, या फोनमध्ये एक मोठा डिस्प्ले देखील दिला जाईल. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिझाइन उपलब्ध असेल. विशेष म्हणजे यात iPhone सारखे डायनॅमिक आयलंड सारखे फीचर देखील पाहायला मिळेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या फोनच्या मागील बाजूस Zenithal डिझाइन देण्यात आले आहे.

itel zeno 10

याव्यतिरिक्त, हा फोन मल्टीटास्किंगमध्ये सर्वोत्कृष्ट असेल. याद्वारे फोनची कामगिरी देखील जबरदस्त असणार आहे, अशी माहिती टीझर पोस्टरद्वारे मिळाली आहे. याशिवाय, फोनशी संबंधित इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. लीकनुसार, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, फोनचे कन्फर्म स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo