itel ने आपला नवीन स्मार्टफोन Vision 3 Turbo लाँच केला आहे. कंपनीने या फोनची किंमत केवळ 7,699 रुपये ठेवली आहे. या किंमतीत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18 W फास्ट चार्जिंग आणि 6 GB रॅम सारखे उत्कृष्ट फीचर्स मिळतील. याशिवाय कंपनी या फोनमध्ये HD+ डिस्प्ले आणि AI कॅमेरा सेटअप देत आहे. कंपनीने हा फोन मल्टी ग्रीन, ज्वेल ब्लू आणि डीप ओशन ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे.
हे सुद्धा वाचा : Google शोध परिणामांमधून स्वतःबद्दल माहिती कशी रिमूव्ह कराल? सोपा मार्ग जाणून घ्या…
कंपनीच्या फोनमध्ये 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा HD + IPS 2.5D डिस्प्ले आहे. फोनमध्ये कंपनी एकूण 6 GB रॅम (3 GB रिअल + 3 GB व्हर्च्युअल) देत आहे. गरज भासल्यास मायक्रो SD कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येते.
या फोनमध्ये तुम्हाला 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर आणि LED फ्लॅशसह VGA कॅमेरा देत आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
स्मार्ट फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 28 तास टिकते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 11 वर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, इअरफोन जॅक आणि GPS सारखे पर्याय देण्यात आले आहेत.