अलीकडेच भारतीय ब्रँडच्या नव्या फिचर फोनची चर्चा सुरु झाली होती आणि आता अखेर Itel ने Itel Super Guru नावाची सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत Itel ने तीन मॉडेल सादर केले आहेत. ब्रँडचे हे तीन फोन सुपर गुरू 200, सुपर गुरू 400 आणि सुपर गुरू 600 या नावाने सादर करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे या फोनने तुम्हाला सहज ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. कारण यात UPI123PAY प्री- लोडेड फीचर मिळेल. या स्मार्टफोन्समध्ये स्टायलिश अल्ट्रा- स्लिम डिझाईन मिळेल. चला तर मग फोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
itel सुपर गुरू सीरिजचे हे फीचर फोन 1,499 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच झालेले आहेत, म्हणजेच ही किंमत सुपर गुरू 200 मॉडेलची आहे. तर, सुपर गुरू 400 ची किंमत 1699 रुपये आहे. टॉप मॉडेल म्हणजेच सुपर गुरू 600 ची किंमत 1,899 रुपये आहे.
हा फोन जवळच्या रिटेल स्टोअर्स व्यतिरिक्त ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.
Super Guru 200 फोनमध्ये 1.8 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा फोन 1200mAh बॅटरीसह येतो, यासह 21 दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. हा फोन SC6531E चिपसेटवर काम करतो, ज्यामध्ये 208MHz प्रोसेसर उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट मिळणार आहे. त्याबरोबरच, यामध्ये कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 1.3MP चा कॅमेरा मिळेल.
https://twitter.com/itel_india/status/1671918872037867520?ref_src=twsrc%5Etfw
Super Guru 400 फोनमध्ये 2.4 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा फोन 1200mAh बॅटरीसह येतो, यासह 14 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. हा फोन SC6531E चिपसेटवर देखील काम करतो, ज्यामध्ये 312MHz प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनमध्ये मागील बाजूस 1.3MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. इतर फीचर्स वरील फोनसारखे मिळतील.
वरील फोनप्रमाणे फोनमधील फीचर्स आहेत. या फीचर फोनमध्ये 2.8 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. हा फोन 1900mAh बॅटरीसह येतो, यासह 20 दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. हा फोन SC6531E चिपसेटवर देखील काम करतो, ज्यामध्ये 312MHz प्रोसेसर उपलब्ध आहे. या फोनच्या मागील बाजूस 1.3MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे.