Itel कंपनी भारतीय ग्राहकांमध्ये स्वस्त स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच, कंपनीने आपला बजेट रेंज स्मार्टफोन Itel S23 लाँच केला आहे. त्यानंतर, आता Itel Super Guru नव्या फिचर फोनची चर्चा टेक विश्वात सुरु झाली आहे. हा फिचर फोन Nokia च्या फीचर फोनला जबरदस्त स्पर्धा देण्यात असल्याचे बोलले जात आहे. या फोनमध्ये ऑनलाईन पेमेंट सारख्या अप्रतिम सुविधा दिले जाणार आहेत. बघुयात सविस्तर-
Itel Super Guru फोनची किंमत 2,500 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनमध्ये रियर कॅमेरा, टॉर्च लाईट, स्पीकर आणि T9 कीपॅड देखील उपलब्ध असतील.
वर सांगितल्याप्रमाणे, Itel नवीन मोबाईल itel Super Guru स्मार्टफोन आणणार आहे. हा एक फीचर फोन असेल, ज्यामध्ये UPI 123Pay फीचरचा सपोर्ट दिला जाणार आहे. याद्वारे युजर फीचर फोनवरून ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे युजर्सना इंटरनेटशिवाय ही सुविधा वापरता येणार आहे.
NPCI ने 'UPI 123pay' फिचर विकसित केले आहे. ही एक पेमेंट सिस्टम आहे, जी खास फीचर फोनसाठी डिझाइन केलेली आहे. हे फिचर इंटरनेटशिवाय UPI पेमेंट सक्षम करते. UPI 123PAY फिचरच्या मदतीने वापरकर्ते चार प्रकारे पेमेंट करू शकतात. पेमेंट पद्धतीमध्ये IVR नंबर, फीचर फोन ऍप, मिस्ड कॉल बेस्ट इंटरफेस आणि साउंड बेस्ट पेमेंट सिस्टम यांचा समावेश आहे.