बजेट स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel ने नवा कीपॅड फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. जेव्हा भारतीय बाजारात 4G कीपॅड फोनची चर्चा होते, तेव्हा रिलायन्सच्या JioPhones चा उल्लेख नक्की होतो. हे JioPhone Prima भारतीय बाजारात 2,599 च्या किमतीत लॉन्च झाले होते. पण, आता JioPhone शी जबरदस्त स्पर्धा करण्यासाठी स्थानिक कंपनी itel ने आपला नवीन 4G कीपॅड फोन भारतात लाँच केला आहे. कंपनीने या नवीन फीचर फोनला ‘Super Guru 4G’ असे नाव दिले आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: सर्वात मजबूत डिस्प्लेसह येणारा Honor X9b 5G फोन आतापर्यंतच्या मोठ्या Discount सह उपलब्ध, बघा Best डील
कंपनीने भारतामध्ये itel Super Guru 4G कीपॅड फोन फक्त 1,799 रुपयांमध्ये सादर केला आहे. हा फोन डार्क ब्लु, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon च्या ऑनलाइन साइट आणि itel च्या अधिकृत साइटवर जाऊन हा फोन खरेदी करता येईल.
itel Super Guru 4G तुम्हाला अनेक विशेष फीचर्स मिळतील. या डिव्हाइसमध्ये तुम्हाला YouTube प्लेबॅकचा सपोर्ट मिळतो, ज्याच्या मदतीने तुम्ही YouTube व्हिडिओ आणि शॉर्ट्स पाहू शकता. याव्यतिरिक्त, या फोनमध्ये आणखी एक खास UPI पेमेंट ऑप्शन्स आहे. यात UPI 123Pay फिचर आहे, जी NPCI द्वारे तयार केलेली झटपट पेमेंट प्रणाली आहे. यासह तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकता.
फोनमध्ये स्टॅंडर्ड कीपॅडसह 2-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी आणि VoLTE साठी सपोर्ट समाविष्ट आहे. हे फक्त Jio च्या 4G नेटवर्क आणि भारतातील इतर सर्व टेलिकॉम ऑपरेटरशी सुसंगत बनवेल. त्याबरोबरच, हा फोन 2G आणि 3G कनेक्टिव्हिटीसाठी समर्थन देखील देईल, जे दुर्गम गावांमध्ये उपयुक्त आहे. फोनमध्ये एक ब्राउझर देखील आहे, जो वेब सर्फ करण्यासाठी वापरता येणार आहे. Itel Super Guru 4G मध्ये 1,000mAh बॅटरी आहे. हा फोन 6 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देतो, असा कंपनीचा दावा आहे.
याव्यतिरिक्त, हा डिव्हाइस 13 भारतीय भाषांना समर्थन देईल, ज्या सेटिंग्जमधून कॉन्फीगर करता येतील. तर, itel Super Guru 4G मध्ये VGA कॅमेरा आहे, जो UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हे इन्स्टंट मेसेजिंग ऍप्लिकेशन LetsChat ला देखील समर्थन देते आणि Tetris, Sokoban आणि 2048 सह इनबिल्ट गेमसह येतो.