Exclusive: Itel S23+ भारतात ‘या’ महिन्यात होणार लाँच, 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये अपेक्षित Price। Tech News

Updated on 20-Sep-2023
HIGHLIGHTS

Itel सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून Itel IP55 5G स्मार्टफोन लाँच करणार

कंपनी itel S23+ स्मार्टफोन Itel S23 चे नेक्स्ट जनरेशन अपग्रेडेड व्हर्जन भारतात आणण्यासाठी सज्ज

Itel S23+ 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल.

अलीकडेच Itel ने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून Itel IP55 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, आता कंपनी itel S23+  स्मार्टफोन Itel S23 चे नेक्स्ट जनरेशन अपग्रेडेड व्हर्जन भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Itel ने जून 2023 मध्ये भारतीय बाजारात कमी बजेटचा स्मार्टफोन Itel S23 लाँच केला होता. जो 50MP कॅमेरा आणि 16GB RAM च्या पॉवरसह फक्त 8,799 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. बघुयात Itel S23+ बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Itel S23+ भारतीय लाँच डेट

 

https://twitter.com/itel_india/status/1704076602349400390?ref_src=twsrc%5Etfw

 

मिळालेल्या माहितीनुसार, Itel S23+ भारतात या महिन्यात सप्टेंबरमध्ये लाँच होईल. मात्र सध्या या स्मार्टफोनची निश्चित लाँच डेट उघड केलेली नाही, परंतु आम्ही अपेक्षा करू शकतो की ब्रँडच्या पहिल्या 5G स्मार्टफोन itel P55 5G सोबत हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात लाँच होऊ शकतो. 

Itel S23+ ची अपेक्षित किंमत

सूत्रांच्या माहितीनुसार, itel S23+ 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. हा नवीनतम स्मार्टफोन AMOLED 3D कर्व डिस्प्लेसह भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

Itel S23+ चे संभावित तपशील

Itel S23+ स्मार्टफोन 6.78 इंच फुल HD+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही एक 3D AMOLED कर्व स्क्रीन असेल, ज्यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे. हा Itel स्मार्टफोन  4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटसह येऊ शकतो. 

पॉवर बॅकअपसाठी, itel S23 Plus 5,000 mAh बॅटरीने सुसज्ज बाजारात लाँच केला जाऊ शकतो. मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग मिळू शकते. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP चा प्राइमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, आकर्षक सेल्फीसाठी यात 32MP कॅमेरा मिळणे अपेक्षित आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :