itel कंपनीने आज म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी itel S23+ आणि itel P55 स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन बजेट किमतीत लाँच करण्यात आले आहेत. विशेष स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, Itel S23 Plus फोनला आयफोनच्या डायनॅमिक आयलंड प्रमाणे डायनॅमिक बार देण्यात आला आहे. ज्यामध्ये यूजर्सना बॅटरी, वेळ आणि नोटिफिकेशन्सशी संबंधित माहिती मिळेल. चला तर मग नवीन स्मार्टफोनच्या किमती आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊयात.
कंपनीने itel S23+ फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये ठेवली आहे.
itel P55 फोनच्या 8GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,699 रुपये आहे. तसेच, फोनच्या 12GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 9,999 रुपयांना येतो.
itel S23+ फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी, ते कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह येते. याशिवाय हा फोन अँड्रॉइड 13 वर काम करतो, ज्यात 8GB रॅम आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 32MP सेल्फी कॅमेरासह येतो. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
itel P55 फोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. फोन Mediatek Dimensity 6080 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.