नवा Affordable स्मार्टफोन itel P55T फोन जंबो बॅटरीसह लाँच, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Updated on 29-Feb-2024
HIGHLIGHTS

नवा itel P55T बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.

कंपनीने itel P55T स्मार्टफोन 8,199 रुपयांमध्ये लाँच केला आहे.

बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता itel ने नवा itel P55T फोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा नवीनतम बजेट फोन आहे, जो कंपनीने 9000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आला आहे. नव्या फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कमी किमतीत फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तर, फोनमध्ये 6000mAh ची जम्बो बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व माहिती-

हे सुद्धा वाचा: अरे वा! 50MP च्या 4 कॅमेऱ्यांसह Vivo V30 Pro स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

itel P55T ची भारतीय किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने itel P55T स्मार्टफोन 8,199 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. हा फोन तुम्ही Flipkart वरून खरेदी करू शकता. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये ब्रिलियंट गोल्ड, अरोरा ब्लू आणि एस्ट्रल ब्लॅक कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

itel P55T चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

itel P55T फोनमध्ये 6.56 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. त्याबरोबरच, हा फोन उत्तम कार्यक्षमतेसाठी UniSoC T606 प्रोसेसरने सुसज्ज असेल. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 4GB रॅम आणि 8GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध आहे, स्टोरेज 128GB पर्यंत मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, Itel P55T स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये AI लेन्सचा समावेश आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, ही 6000mAh ची जंबो बॅटरी आहे, ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :