Asolutely Lowest! itel P55 सिरीज भारतात लाँच, कमी किमतीत अगदी Powerful फीचर्स उपलब्ध 

Asolutely Lowest! itel P55 सिरीज भारतात लाँच, कमी किमतीत अगदी Powerful फीचर्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

itel P55 सिरीज भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे.

itel P55 स्मार्टफोन 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफरसह लाँच

दोन्ही स्मार्टफोन्सवर 500 रुपयांची बँक डिस्काउंट उपलब्ध आहे.

बजेट विभागातील itel P55 सिरीज भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली आहे. सीरीज अंतर्गत, कंपनीने itel P55 आणि itel P55+ हे दोन स्मार्टफोन समाविष्ट केले आहेत. या सिरीजमधील प्लस व्हेरिएंट हा भारतात 45W स्मार्ट चार्जिंग सपोर्टसह येणारा पहिला हँडसेट आहे. या फोन्समध्ये जंबो बॅटरी पॅक देण्यात आला आहे. त्याबरोबरच, दोन्ही स्मार्टफोन नवीनतम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. जाणून घेऊयात फोनची किमंत, फीचर्स आणि स्पेसीफाकेशन्स-

हे सुद्धा वाचा: BSNL ची भारी ऑफर! ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये अतिरिक्त 3GB डेटा Free, जाणून घ्या सर्व लाभ। Tech News

itel P55 सिरीजची भारतीय किंमत

itel P55 स्मार्टफोन 6,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफरसह लाँच करण्यात आला आहे. ही किमंत फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. हे फोन्स रॉयल ग्रीन आणि मेटियर ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आले आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही स्मार्टफोन ऑफलाईन खरेदी करता येतील.

तर दुसरीकडे, itel P55+ स्मार्टफोन 9,499 रुपयांना ऑफरसह येतो. यात 8GB रॅम असून 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. दोन्ही स्मार्टफोन्सवर 500 रुपयांची बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India वरून होईल. हा फोन मूनलाईट ब्लॅक, अरोरा ब्लू आणि ब्रिलियंट गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. या फोनची विक्री 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरू होईल.

itel P55 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

itel P55 सिरीजच्या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Unisoc T606 Octa Core प्रोसेसर आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि लॉक/अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक सारखी फीचर्स देखील आहेत. दोन्ही हँडसेट साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर्ससह येतात.

itel p55

फोटोग्राफीसाठीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या मागील बाजूस 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP फ्रंट कॅमेरासह सुसज्ज आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. मात्र, चार्जिंग सपोर्टच्या बाबतीत फोन वेगळे आहेत. itel P55+ मध्ये 45W चार्जिंग सपोर्ट आहे, तर itel P55 मध्ये 18W चार्जिंग सपोर्ट आहे. दोन्ही फोनमध्ये USB टाइप-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo