itel ने लाँच केला सर्वात स्वस्त फोन! तब्बल 33 दिवसांच्या बॅटरी लाईफसह दुर्गम भागातही मजबुत कनेक्टिव्हिटी

नवा फिचर फोन itel King Signal भारतात लाँच करण्यात आला आहे.
itel King Signal फोनसह वापरकर्त्यांना दुर्गम भागातही मजबूत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
नवा फोन 40 ते 70 अंशांच्या अति उष्णतेतही काम करू शकतो.
itel चा नवीन फीचर फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फिचर फोन itel King Signal आहे. हा छोटासा फोन अनेक जबरदस्त फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. जो विशेषतः अशा भागांसाठी डिझाइन करण्यात आला आहे, जिथे सिग्नल कव्हरेज कमी असतो. या फोनची ही विशेषता आहे की, वापरकर्त्यांना सर्वत्र मजबूत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय, हा फोन 40 ते 70 अंशांच्या अति उष्णतेतही काम करू शकतो, असे देखील संगणयत आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात किंमत आणि सर्व फीचर्स-
Also Read: आगामी CMF फोन लवकरच भारतात होणार लाँच! पहिल्या CMF Phone 1 पेक्षा किती असेल वेगळा?
itel King Signal ची किंमत
itel King Signal फीचर फोनची किंमत 1,099 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, ग्राहकांना आर्मी ग्रीन, ब्लॅक आणि पर्पल रेड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या फोनवर 13 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे.
itel King Signal चे स्पेसिफिकेशन्स
नव्या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 2 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. नवीन फीचर फोन itel King Signal मध्ये सिल्व्हर-प्लेटेड सिग्नल एन्हांसमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे कमी नेटवर्क असलेल्या भागात वापरकर्त्यांना 62% जलद कनेक्टिव्हिटी मिळेल आणि वापरकर्ते विना अडथडा म्हणजेच सिमलेस कॉल करण्यास सक्षम असतील.
हा फोन अनेक विशेषतांनी परिपूर्ण आहे. या itel फोनमध्ये तीन सिम कार्ड बसवता येतील. याशिवाय, फोनमध्ये 500 मेसेजेस देखील स्टोअर करता येतात. लक्षात घ्या की, या फोनमध्ये तुम्हाला तब्बल 2000 पर्यंत संपर्क सेव्ह करता येतील. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 1500mAh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 33 दिवस चालेल. जलद चार्जिंगसाठी या फोनमध्ये USB-C पोर्ट देखील देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर, फोटो काढण्यासाठी फोनमध्ये VGA कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये अर्थातच युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. म्युझिक लव्हर्ससाठी FM ची सोय आहे. यासोबतच, डिव्हाइसमध्ये किंग व्हॉइस, व्हायब्रेशन मोड, टॉर्च, म्युझिक, कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ प्लेबॅकची सुविधा देखील देण्यात आली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile