itel Flip 1: बजेट स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता itel कंपनीने भारतात आपला नवा फ्लिप फोन लाँच केला आहे. हा फ्लिप फोन ‘itel Flip 1’ नावाने सादर केला गेला आहे. कंपनीने हा फोन ‘Flip it like a Boss’ या टॅगलाइनसह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फ्लिप फोनची किंमत 3000 रुपयांपेक्षा कमी आहे. तुमच्या लक्षात आले असेल की, हा कंपनीचा एक फीचर फ्लिप फोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला लेदर प्रीमियम डिझाइन मिळेल. जाणून घेऊयात itel Flip 1 फोनची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील-
Also Read: Realme 12x 5G फोन अगदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर्स उपलब्ध
itel कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलद्वारे itel Flip 1 फोन लाँचबद्दल माहिती शेअर केली आहे. कंपनीने या फोनची किंमत फक्त 2,499 रुपये इतकी निश्चित केली आहे. जरी हा फोन बॅक पॅनलवरून प्रीमियम फ्लिप स्मार्टफोनसारखा दिसत असला तरी, हा कंपनीचा फीचर कीपॅड फोन आहे.
तुम्ही वर दिलेल्या पोस्टमध्ये या फोनची डिझाईन आणि सर्व तपशील पाहू शकता. या फ्लिप फोनच्या मागील बाजूस एक अप्रतिम लेदर फिनिश दिसत आहे. हा कंपनीचा एक फीचर फ्लिप फोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला लेदर प्रीमियम डिझाइन, टाइप-सी चार्जिंग आणि ब्लूटूथ कॉलर सारखे फीचर्स मिळतात.
itel Flip 1 फोनमध्ये 2.4 इंच लांबीची स्क्रीन देण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनच्या मागील बाजूस लेदर डिझाइन देण्यात आले आहे. त्याबरोबरच, कीपॅडवर ग्लास डिझाइन देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये तुम्हाला ब्लूटूथ सपोर्ट देखील मिळतो. या फोनमध्ये ग्लास कीपॅड देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 1200mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला USB Type-C चार्जिंग सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की फोन एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत बॅकअप देईल. फोटोग्राफीसाठी, itel Flip 1 फोनच्या मागील बाजूस VGA कॅमेरा उपलब्ध आहे. VGA म्हणजे ‘व्हिडिओ ग्राफिक्स ॲरे’ होय.