Itel चा नवा 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी, अप्रतिम ऑफर्स उपलब्ध

Updated on 17-Jul-2024
HIGHLIGHTS

नवा itel ColorPro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

itel ColorPro 5G फोनवर अनेक अप्रतिम लाँच ऑफर्स उपलब्ध आहे.

itel ColorPro 5G फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

Itel कंपनी बजेट श्रेणीमध्ये चांगले स्मार्टफोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने आता आपला नवा itel ColorPro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केला. लाँचऑफर अंतर्गत ग्राहकांना मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट इ. अनेक फायदे मिळत आहेत. itel ने हा फोन नेक्स्ट जनरेशन IVCO (itel Vivid Color) तंत्रज्ञानासह सादर केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात itel ColorPro 5G फोनची किंमत-

Also Read: Realme Watch S2 ची लाँच डेट कन्फर्म! AI व्हॉईस असिस्टंटसह लेटेस्ट स्मार्टवॉच लवकरच भारतात होणार दाखल

itel ColorPro 5G ची भारतीय किंमत आणि ऑफर्स

कंपनीने नवा itel ColorPro पॉवरफुल 5G++ स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा फोन लॅव्हेंडर फँटसी आणि रिव्हर ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, लाँच ऑफर अंतर्गत ग्राहकांना 3000 रुपयांची डफल ट्रॉली बॅग मोफत दिली जात आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्री वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा देखील मिळेल, ज्याची किंमत साधारणपणे 2000 रुपये आहे.

itel ColorPro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

itel ColorPro 5G फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. हा फोन 10 5G बँडला सपोर्ट करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6080 Octa Core प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये म्हणजेच 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेजसह लाँच केला आहे. त्याबरोबरच, या हँडसेटमध्ये 6GB व्हर्चुअल रॅम ऑप्शनदेखील आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंगसह या फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरीसह सुसज्ज आहे. त्याबरोबरच, फोन अनलॉक करण्यासाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस आयडीलाही सपोर्ट करतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :