itel ColorPro 5G चा नवा व्हेरिएंट भारतात लाँच! फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदीची संधी, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध  

itel ColorPro 5G चा नवा व्हेरिएंट भारतात लाँच! फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदीची संधी, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध  
HIGHLIGHTS

बजेट स्मार्टफोन itel ColorPro 5G चे 4GB मॉडेल भारतात लाँच

मर्यादित काळातील विशेष ऑफरमध्ये केवळ 7,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी

itel ColorPro 5G बजेट फोनच्या कॅमेरा विभागात तुम्हाला AI फीचर्स देखील मिळणार आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel ने आपला बजेट स्मार्टफोन itel ColorPro 5G चे 4GB मॉडेल भारतात लाँच केले आहे. हा एक अनोखा स्मार्टफोन आहे, जो iVCO म्हणजेच itel Vivid Color तंत्रज्ञानासह आकर्षक रंग बदलणारा बॅक पॅनल देतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात पॉवरफुल NRCA (5G++) तंत्रज्ञान आहे. त्यामुळे तुम्हाला यासह दुर्गम ठिकाणीही उत्कृष्ट 5G कनेक्टिव्हिटी मिळेल. खास गोष्ट म्हणजे हा फोन तुम्हाला फक्त 8,000 रुपये किमतीत मिळेल.

Also Read: 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo Y300 Plus 5G फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

itel ColorPro 5G च्या 4GB व्हेरिएंटची किंमत

itel ColorPro 5G स्मार्टफोनचा नवा 4GB+ 128GB व्हेरिएंट मर्यादित काळातील विशेष ऑफरमध्ये केवळ 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ज्यामध्ये 1,000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे. तर, या फोनची सामान्य किंमत 8,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला हा फोन ऑनलाइन आणि रिटेल आउटलेटवर मिळेल.

ब्रँडने यापूर्वी जुलैमध्ये 6GB RAM + 128GB अंतर्गत स्टोरेजमध्ये डिव्हाइस लाँच केले होते. ज्याची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली होती. लक्षात घ्या की, सामान्य रॅम मेमरीसह फोनमध्ये 4GB आणि 6GB मेमरी फ्यूजन तंत्रज्ञान देखील आहे, ज्यामुळे तुम्हाला 8GB आणि 12GB रॅम वापरता येईल.

itel ColorPro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Itel Color Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच डिझाइनने सुसज्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6080 चिपसेट सह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, त्वरीत चार्ज करण्यासाठी यात 18W सपोर्ट देखील आहे.

itel colorpro 5g

itel ColorPro 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश उपलब्ध आहे. बजेट फोनमध्ये तुम्हाला AI फीचर्स देखील मिळणार आहेत. ज्यामध्ये 50MP AI प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, समोर 8MP AI सेन्सर मिळेल. फोनच्या मागील कॅमेऱ्यात पॅनोरमा मोड, प्रो मोड, AR शॉट आणि टाइम लॅप्स सारखी फीचर्स मिळतील. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनला 10 5G बँडचा सपोर्ट मिळतो. यात ड्युअल सिम, 5G, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

फोनबद्दल विशेष बाब म्हणजे Itel colorPro 5G स्मार्टफोन नेक्स्ट-जेन IVCO (Itel Vivid Color) तंत्रज्ञानासह स्वस्त किंमतीत येतो. त्याच्या मदतीने, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर फोनच्या मागील पॅनेलचा रंग बदलतो. जे याला इतर फोनपेक्षा वेगळे बनवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo