12GB पर्यंत RAM सह itel A70 स्मार्टफोन भारतात लाँच, Affordable किमतीत मिळतायेत आकर्षक फीचर्स। Tech News 

12GB पर्यंत RAM सह itel A70 स्मार्टफोन भारतात लाँच, Affordable किमतीत मिळतायेत आकर्षक फीचर्स। Tech News 
HIGHLIGHTS

itel A70 आणखी एक बजेट स्मार्टफोन भारतात लाँच

itel A70 स्मार्टफोन भारतात 6,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच

लेटेस्ट स्मार्टफोनवर बँकऑफर अंतर्गत 800 रुपयांची सूट मिळेल.

बजेट किमतीत अप्रतिम स्मार्टफोन ऑफर करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत Itel नाव प्रसिद्ध आहे. कंपनीने भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन itel A70 नावाने लाँच केला आहे. लो बजेटमध्ये हा फोन स्लिम आणि स्टायलिश डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये ग्लास फिनिश दिसत आहे. चला तर मग नवीनतम स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: आकर्षक डिस्प्लेसह OnePlus 12R भारतात होणार दाखल, लाँचपूर्वी स्मार्टफोनचे सर्व स्पेक्स लीक। Tech News

Itel A70 4G launched_ Color Options
Itel A70 Color Options

itel A70 ची भारतीय किंमत

itel A70 स्मार्टफोन भारतात 6,299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तर, फोनच्या 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 6,799 रुपयांना आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 7,299 रुपयांना सादर केला गेला आहे.

फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक ऑफर अंतर्गत 800 रुपयांची सूट मिळेल. तर, या स्मार्टफोनची विक्री 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन चार कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

itel A70 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ITEL A70

स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. यात Unisoc T603 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. या फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 128GB स्टोरेज आहे आणि टॉप वेरिएंटमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज आहे. एवढेच नाही तर, मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज तब्बल 2TB पर्यंत वाढवता येते. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 13MP मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये टाइप-C पोर्ट देखील मिळेल. याशिवाय फोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo