Absolutely Lowest! 256GB सह सर्वात स्वस्त Itel A70 स्मार्टफोनचे भारतीय लाँच कन्फर्म, टीझर Amazon वर LIVE 

Absolutely Lowest! 256GB सह सर्वात स्वस्त Itel A70 स्मार्टफोनचे भारतीय लाँच कन्फर्म, टीझर Amazon वर LIVE 
HIGHLIGHTS

नवा स्मार्टफोन itel A70 नावाने लवकरच भारतात लाँच होणार

itel A70 आगामी फोन 2024 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये लॉन्च केला जाईल.

256GB स्टोरेजसह येणारा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.

स्वस्त स्मार्टफोन्ससाठी प्रसिद्ध असणारी कंपनी नव्या वर्षात आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. itel ने आपल्या सर्वात स्वस्त 256GB स्टोरेजसह आगामी स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवा स्मार्टफोन itel A70 नावाने लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. आता Amazon प्लॅटफॉर्मवर त्याचा नवीन टीझर देखील समोर आला आहे. जाणून घेऊयात आगामी स्मार्टफोनबद्दल सर्व अपडेट्स-

Itel A70 चे टीजर आणि डिझाईन

Amazon वरील टीजरनुसार itel A70 आगामी फोन येत्या नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये लॉन्च केला जाईल. हा स्मार्टफोन 256GB आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसह येणार आहे. जर आपण फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन फ्लॅट फ्रेम आणि ग्लास फिनिश डिझाइनसह येऊ शकतो. तर, फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल AI मॅट्रिक्स कॅमेरा देखील स्पष्टपणे दिसत आहे.

Itel A70 4G launched_ Color Options
Itel A70 Color Options

एवढेच नाही तर टीझरद्वारे हे देखील स्पष्ट झाले आहे की, iPhone मध्ये उपलब्ध असलेले डायनॅमिक आयलंडसारखे फिचर देखील या फोनमध्ये मिळणार आहे. कलर ऑप्शन्स बद्दल बोलायचे झाले तर, हा डिवाइस ब्लॅक, लाइट ब्लू, यलो आणि ग्रीन अशा चार कलर ऑप्शन्ससह येईल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील Itel A70 ची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, असे लीक देखील पूढे आले आहे. जर हे लीक खरी ठरले तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला हा या किंमतीतील पहिला आणि सर्वात स्वस्त फोन असेल.

Itel A70 चे लीक स्पेक्स

लीकनुसार, Itel A70 मध्ये 6.6 इंच लांबीचा FHD Plus डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनमध्ये कामगिरीसाठी Unisoc T603 चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, डिवाइस 8GB व्हर्च्युअल रॅमच्या समर्थनासह देखील येण्याची शक्यता आहे. बॅटरीच्या बाबतीत, स्मार्टफोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असू शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo