Itel कंपनी आपल्या बजेट रेंज स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहे. नुकतेच कंपनीने Itel S23 स्मार्टफोन लाँच केला, ज्याची किंमत 8,799 रुपये आहे. दरम्यान, तुमच्या लक्षात येईल की Itel च्या अधिकतर स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांच्या आत आहे. आता कंपनी Itel A60s लाँच करण्याच्या तयारीत आहे. Itel A60s बद्दल असे सांगितले जात आहे की हा देशातील 8 GB रॅम असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल.
Itel A60s चे प्रमोशनल पेज देखील Amazon वर लाइव्ह करण्यात आले आहे. Itel A60s आगामी स्मार्टफोन 8GB RAM सह ऑफर केला जाईल. मात्र, फोनमध्ये फ्यूजन मेमरी टेक्नॉलॉजीद्वारे 4GB व्हर्च्युअल रॅम असेल. वर सांगितल्याप्रमाणे हा स्वस्त फोन असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, लाँचनंतरच फोनच्या मूळ किमतीबद्दल माहिती मिळेल.
Itel A60s ची डिस्प्ले स्टाईल वॉटरड्रॉप नॉच असेल यासह स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर मिळू शकतो. त्याबरोबरच, यात 5000mAh बॅटरी मिळणार आहे, ज्यासह 10W वायर चार्जिंग उपलब्ध असणार आहे . Itel A60s मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. कॅमेरासोबत LED लाईट देखील मिळेल. फोनच्या मागील पॅनलवर सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.