फक्त 5,999 रुपयांमध्ये Itel चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, आता बजेटमध्ये मिळतील अप्रतिम फीचर्स
Itel A60 बजेट स्मार्टफोन लाँच
नवा स्मार्टफोन प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत लाँच
बजेटमध्ये तुम्हाला प्रतिमा फीचर्स मिळणार आहेत.
हँडसेट निर्माता कंपनी Itel ने आपल्या A सीरीज अंतर्गत ग्राहकांसाठी एक नवीन परवडणारा स्मार्टफोन Itel A60 लाँच केला आहे. हा फोन प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा आहे. या बजेट स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच डिझाइन देण्यात आले आहे. चला तर बघुयात या फोनमधील विशेष फीचर्स…
हे सुद्धा वाचा : Flipkart Big Saving Days Sale 2023ची तारीख जाहीर, स्मार्टफोन्सवर मिळेल 10 हजार रुपयांपर्यंत सूट
Itel A60चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Itel India च्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD Plus (720 x 1612 pixels) IPS LCD डिस्प्ले आहे, जो 120 Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. हा नवीनतम फोन Android 12 (Go Edition) आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये 1.4 GHz क्वाड-कोर SC9832E प्रोसेसरसह 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 128 GB पर्यंत वाढवणे शक्य आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यासोबत असा दावा करण्यात आला आहे की बॅटरी 750 तासांचा स्टँडबाय टाइम देते. फोनमध्ये वाय-फाय, ड्युअल सिम सपोर्ट, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक समाविष्ट आहे. सुरक्षेसाठी या बजेट स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, itel A60 च्या मागील पॅनल वर LED फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या बजेट फोनमध्ये समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.
Itel A60 ची भारतात किंमत
या itel स्मार्टफोनचा फक्त एक व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. जो 2GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह सज्ज आहे. मॉडेल विकत घेण्यासाठी तुम्हाला 5,999 रुपये खर्च करावे लागतील. Dawn Blue, Vert Menthe आणि Sapphire Black या तीन वेगवगेळ्या रंगांच्या शेड्समध्ये हा फोन खरेदी करता येईल. त्याबरोबरच, हा बजेट फोन कंपनीच्या स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile