नवा IQOO Z9x 5G ची लेटेस्ट Vivo T3x 5G स्मार्टफोनसह जबरदस्त स्पर्धा, बघा दोन्हीचे टॉप 5 तपशील। Tech News 

नवा IQOO Z9x 5G ची लेटेस्ट Vivo T3x 5G स्मार्टफोनसह जबरदस्त स्पर्धा, बघा दोन्हीचे टॉप 5 तपशील। Tech News 
HIGHLIGHTS

नुकतेच IQOO Z9x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

IQOO Z9x 5G ची लेटेस्ट Vivo T3x 5G स्मार्टफोनसह थेट स्पर्धा

iQOO Z9x 5G आणि Vivo T3x 5G फोनचे जवळपास जास्तीत जास्त तपशील एकसमान

आज 16 मे 2024 नुकतेच IQOO Z9x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. उत्तम परफॉर्मन्स आणि मोठ्या बॅटरीसह हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन लाँच होताच बाजारात इतर प्रसिद्ध स्मार्टफोन्ससह थेट जबरदस्त स्पर्धा करतोय. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला IQOO Z9x 5G ची तुलना अलीकडेच लाँच झालेल्या लेटेस्ट Vivo T3x 5G स्मार्टफोनसह करून सांगणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात दोन्ही फोनचे टॉप फीचर्स-

iQOO Z9x 5G आणि Vivo T3x 5G ची किंमत

iQOO Z9x 5G फोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 12,499 रुपये आहे. त्याचप्रमाणे, फोनच्या 8GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 15,999 रुपये इतकी आहे.

दुसरीकडे, Vivo T3x 5G फोन सध्या Flipkart वर 4GB रॅमसह 13499 रुपये आहे. तर, 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB रॅम व्हेरिएंट 16,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

iQOO Z9x 5G Vs Vivo T3x 5G

डिस्प्ले

iQOO Z9x स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. तर, नवीनतम Vivo T3x 6.72-इंच FHD+ IPS LCD डिस्प्लेसह सुसज्ज आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

iQoo Z9x 5G Features
iQoo Z9x 5G Features

प्रोसेसर

iQOO फोनमध्ये ग्राहकांना 4nm प्रक्रियेवर तयार केलेला Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर मिळेल. यामध्ये तुम्हाला Adreno 710 GPU पण मिळत आहे. यासह तुम्ही तुमचे दैनंदिन काम सहज करू शकता. तर, दुसरीकडे Vivo T3x 5G फोन देखील Qualcomm Snapdragon 6 Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल.

कॅमेरा

iQOO Z9x 5G स्मार्टफोनमध्ये ग्राहकांसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य सेन्सर आहे. याशिवाय, फोनमध्ये 2MP डेप्थ सेन्सर देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 8MP सेल्फी कॅमेरा देखील मिळतो, जो f/2.05 अपर्चरवर चालतो.

याव्यतिरिक्त, Vivo T3x 5G हँडसेटमध्ये 50MP प्रायमरी लेन्स मिळेल. तर, सेकंडरी 2MP डेप्थ सेन्सर देखील यात उपलब्ध आहे. तसेच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी T3x मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेराच्या बाबतीत दोन्ही फोन समान आहेत.

बॅटरी

iQOO च्या फोनचे सर्वात विशेष फिचर म्हणजे कमी किमतीत या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी मिळेल. या बॅटरीसोबत कंपनीने 44W फ्लॅशचार्ज देखील दिला आहे. तुम्हाला या फोनमध्ये 30 तास सोशल मीडिया स्क्रोलिंग सपोर्ट मिळतो. त्याबरोबरच, 71 तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि 21 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देखील दिला जात आहे.

Vivo T3x 5G battery details confirmed
Vivo T3x 5G battery details

तर, दुसरीकडे Vivo T3x 5G स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये देखील 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. म्हणेजच एकूणच या दोन्ही फोनमधील बॅटरी सारखीच आहे.

निष्कर्ष

वरील दोन्ही फोनचे सर्व तपशील बघता iQOO Z9x 5G आणि Vivo T3x 5G फोनचे जवळपास जास्तीत जास्त तपशील एकसमान आहेत. फोन्सच्या डिझाईनमध्ये तुम्हाला थोडा फरक बघायला मिळतो. त्याबरोबरच, दोन्ही फोनच्या किमतीत मोठी तफावत बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोनची निवड केल्यास, तोच फोन तुमच्यासाठी योग्य राहील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo