अलीकडेच IQOO चा नवीन स्मार्टफोन iQOO Z9x 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली आहे. हा फोन भारतात येत्या 16 मे रोजी लाँच केला जाईल. मात्र, लाँचपूर्वी कंपनीने आता फोनच्या काही फीचर्सची पुष्टी केली आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. जाणून घेऊयात फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: Vivo V30e 5G फोनची पहिली Sale भारतात सुरु, जबरदस्त ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन। Tech News
iQOO India ने अलीकडेच iQOO Z9x 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची पुष्टी केली आहे. हा फोन 16 मे रोजी भारतात दाखल होईल. दरम्यान, आता कंपनीने त्याच्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे फोनची समर्पित मायक्रोसाइट लाईव्हची लिंक शेअर केली आहे. हा फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. आता Amazon लिस्टिंगद्वारे फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे, iQOO Z9x 5G साठी समर्पित मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह झाली आहे. या लिस्टद्वारे फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. हा फोन 6.72 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये पंच-होल कटआउट दिले जाईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. पाण्यापासून संरक्षणासाठी फोनमध्ये IP64 रेटिंग मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, 44W फास्ट चार्जिंगसह फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली जाईल. एका चार्जवर हा फोन 2 दिवस चालेल, असा कंपनीचा दावा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.