iQOO Z9s सीरीज 21 ऑगस्ट रोजी भारतात होणार लाँच, आगामी स्मार्टफोन्समध्ये काय मिळेल विशेष?
IQOO ची नवी स्मार्टफोन सिरीज iQOO Z9s सीरीज भारतीय लाँचसाठी सज्ज
iQOO Z9s सिरीज 25000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केली जाईल.
iQOO Z9s सिरीजच्या स्मार्टफोन्समध्ये अनेक AI कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध असतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता IQOO ची नवी स्मार्टफोन सिरीज iQOO Z9s सीरीज भारतीय लाँचसाठी सज्ज झाली आहे. ही सिरीज येत्या 21 ऑगस्ट रोजी भारतात सादर केली जाईल. या सिरीजअंतर्गत, कंपनी iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro असे दोन फोन्स सादर करेल, असे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर, लाँचपूर्वी कंपनीने या सिरीजशी संबंधित अनेक तपशील देखील उघड केले आहेत. चला तर मग बघुयात आगामी iQOO Z9s सिरीजची अपेक्षित किंमत आणि काय मिळेल विशेष?
Also Read: HONOR 200 Pro 5G वर Amazon सेलदरम्यान मोठी सूट उपलब्ध, होईल हजारो रुपयांची बचत
iQOO Z9s सिरीजची अपेक्षित किंमत
Experience the Ultimate Power and Speed with the Segment's Fastest* Curved Display Phone – #iQOOZ9sPro! 🚀 Powered by the ultimate Snapdragon 7 Gen 3. Feel the rush of speed and power in every swipe and tap! 📱✨
— iQOO India (@IqooInd) August 7, 2024
*On the basis of AnTuTu Score of 8.2L,as per the product launched… pic.twitter.com/Bv4EsGNGsv
कंपनी iQOO Z9s च्या टीझर पोस्टरद्वारे खुलासा केला आहे की, ही सिरीज भारतात 25000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केली जाईल. iQOO Z9s फोन 19,999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केला जाऊ शकतो. तर, प्रो मॉडेलची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल, असे मानले जात आहे.
iQOO Z9s सीरीज
आगामी iQOO Z9s सीरीजबद्दल बरीच माहिती पुढे आली आहे. होय, कंपनीने लाँचपूर्वी या सीरिजच्या अनेक फीचर्सची पुष्टी केली आहे. iQOO Z9s Pro फोनमध्ये 3D कर्व AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. तसेच, उत्तम परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5500mAh बॅटरी आहे.
आगामी फोनमधील कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह येईल. त्याबरोबरच, 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील उपलब्ध असेल. तसेच, फोनमध्ये अनेक अनेक AI कॅमेरा फीचर्स देखील उपलब्ध असतील, ज्यात AI इरेज आणि AI फोटो एन्हान्सचा समावेश असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन फ्लॅम्बॉयंट ऑरेंज व्हेगन लेदर बॅक आणि लक्स मार्बल या कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात येईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile