टॉप क्लास फीचर्ससह लेटेस्ट IQOO Z9s सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

टॉप क्लास फीचर्ससह लेटेस्ट IQOO Z9s सिरीज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

अखेर iQOO ची लेटेस्ट iQOO Z9s सीरीज भारतीय बाजारात लाँच

iQOO Z9s सिरीजची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे.

लाँच ऑफरअंतर्गत, या iQOO Z9s सीरीज स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.

IQOO च्या आगामी सिरीजची चर्चा अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. अखेर iQOO Z9s सीरीज भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या लाइनअपमध्ये iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नवीनतम स्मार्टफोन्समध्ये पॉवरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, नवीनतम हँडसेटमध्ये AI कॅमेरा देखील मिळेल. नव्या सिरीजमधील हे स्मार्टफोन Xiaomi, Oppo सारख्या ब्रँडच्या मोबाईल फोन्सना जोरदार स्पर्धा देतील, असे दिसत आहेत. पाहुयात IQOO Z9s सिरीजची किंमत ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: 200MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Redmi Note 13 Pro वर मिळतोय भारी Discount, अशी डील पुन्हा मिळणार नाही

IQOO Z9s सिरीजची किंमत आणि ऑफर्स

iQOO Z9s सिरीजची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. तर, लाइनअपचे टॉप मॉडेल म्हणजेच iQOO Z9s Pro 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे. लाँच ऑफरअंतर्गत, या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. नव्या स्मार्टफोनची विक्री Amazon India वर 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर, iQOO Z9s Pro फोन 23 ऑगस्टपासून Amazon वरून 3000 रुपयांच्या सवलतीत खरेदीसाठी उपलब्ध होईल.

IQOO Z9s सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

IQOO Z9s स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांचा डेटा सुरक्षित ठेवता येईल. तर, iQOO Z9s Pro मध्ये 3D AMOLED कर्व स्क्रीन आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे.

प्रोसेसर

IQOO Z9s स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, iQOO Z9s Pro मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिप आणि Adreno 720 GPU सह देण्यात आला आहे.

कॅमेरा

IQOO Z9s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅश लाईटसह ड्युअल एआय रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करणारा 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स आहे. याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतो. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.

तर, iQOO Z9s Pro मध्ये हँडसेटमध्ये गोल-आकाराच्या LED लाइटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP OIS लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल आणि दुसरा 2MP सेन्सर आहे.

बॅटरी

स्मार्टफोन ब्रँडने Z9S मध्ये 44w फास्ट चार्जिंगसह 5500mAh बॅटरी प्रदान केली आहे. तर, iQOO Z9s Pro मध्ये 5500mAh ची मजबूत बॅटरी आहे. यात 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

कनेक्टिव्हिटी

या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी स्पेक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo