iQOO Z9s सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! तुमच्या बजेटमध्ये असेल का आगामी स्मार्टफोन?
आगामी iQOO Z9s सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म
iQOO कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Nipurn Marya यांनी सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली माहिती
iQOO Z9s सिरीजच्या स्मार्टफोन्समध्ये कर्व डिस्प्ले मिळेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO Z9s सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म झाली आहे. या सिरीजमध्ये कंपनी iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro हे दोन फोन सादर करणार आहे. या सिरीजची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. अखेर कंपनीने या सीरिजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. तसेच, कंपनीने या फोनचे काही फीचर्सदेखील उघड केले आहे. हा स्मार्टफोन भारतात या महिन्यातच लाँच होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात iQOO Z9s सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Limited Time Deal! Vivo V40 लाँचपूर्वी Vivo V30 5G फोन तब्बल 5000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध, पहा ऑफर
iQOO Z9s सीरिजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स
Mark your calendar— #iQOOZ9sSeries will elevate your Megatasking game! #FullyLoadedForTheMegaTaskers pic.twitter.com/HfSkKpPqP2
— Nipun Marya (@nipunmarya) August 1, 2024
प्रसिद्ध iQOO कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी Nipun Marya यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हँडलद्वारे iQOO Z9s सिरीजच्या भारतातील लॉंच डेटची पुष्टी केली आहे. ही सिरीज 21 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. फोनच्या लाँच डेटसोबतच कंपनीने पुष्टी केली आहे की, हा फोन 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत कर्व डिस्प्लेसह उपलब्ध असेल.
iQOO Z9s सिरीजबद्दल लीक्स
iQOO Z9s सिरीजबद्दल अनेक लीक्स पुढे आले आहेत. लीक झालेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Z9s आणि iQOO Z9s Pro स्मार्टफोन्समध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच लांबीचा कर्व AMOLED FHD+ डिस्प्ले असू शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगमध्ये iQOO Z9s फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तर, प्रो मॉडेल Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाईल. तर, इतर सेन्सर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, लीकनुसार, बेस मॉडेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह दाखल होईल. तर, प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवरसाठी या फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile