iQOO Z9 Lite 5G Vs Redmi 13 5G: 15000 रुपयांच्या आत कोणता स्मार्टफोन ठरेल तुमच्यासाठी योग्य? बघा डिटेल्स 

iQOO Z9 Lite 5G Vs Redmi 13 5G: 15000 रुपयांच्या आत कोणता स्मार्टफोन ठरेल तुमच्यासाठी योग्य? बघा डिटेल्स 
HIGHLIGHTS

iQOO Z9 Lite 5G आणि Redmi 13 5G हे दोन्ही फोन भारतीय बाजारात अलीकडेच लाँच

15000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये नवीनतम 5G स्मार्टफोन्स उपलब्ध

Redmi 13 5G हा फोन iQOO Z9 Lite 5G पेक्षा किंचित जास्त महाग आहे.

अलीकडेच iQOO Z9 Lite 5G आणि Redmi 13 5G हे दोन्ही फोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन बजेटमध्ये सादर करण्यात आले आहेत. तुम्ही 15000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. iQOO Z9 Lite 5G ची किंमत फक्त 10,499 रुपयांपासून सुरू होते, तर Redmi 13 5G ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. या लेखात आम्ही iQOO Z9 Lite 5G आणि Redmi 13 5G च्या फीचर्सची तुलना करून सांगणार आहोत.

iQOO Z9 Lite 5G Vs Redmi 13 5G

डिस्प्ले

Redmi 13 5G मध्ये FHD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि मोठ्या स्क्रीनसह चांगला डिस्प्ले आहे. फोनमध्ये डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देखील आहे. त्याबरोबरच, यात वेट टच फिचर देखील आहे, ज्याद्वारे तुम्ही ओल्या हातांनी डिव्हाइस वापरू शकता.

iQOO Z9 Lite 5G launched in india

तर, iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे.

प्रोसेसर

iQOO Z9 Lite 5G मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा Redmi 13 5G फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह येतो.

कॅमेरा

iQOO Z9 Lite 5G मध्ये कंपनीने AI रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 2MP बोकेह सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

तर, Redmi 13 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108MP मुख्य कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस 2MP सेंसर उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

redmi 13 5g

बॅटरी

पॉवरसाठी, iQOO Z9 Lite 5G फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. फोन पूर्ण चार्ज केल्यावर 9 तास गेमिंग, 23 तास बिंज-वॉचिंग, 32 तास सोशल मीडिया आणि 84 तास म्युझिक प्लेबॅक टाइम देतो.

तर, Redmi 13 5G फोनमध्ये 5030mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह येते. हा फोन 50% चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

निष्कर्ष

वरील माहितीवरून आपल्याला समजते की, Redmi 13 5G ची फीचर्स थोडी चांगली आहेत. परंतु तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की, Redmi 13 5G हा फोन iQOO Z9 Lite 5G पेक्षा किंचित जास्त महाग आहे. मात्र, iQOO Z9 Lite 5G पाहिल्यास, ते किंमत श्रेणीनुसार जबरदस्त फीचर्स ऑफर करते. तुमचे बजेट मर्यादित असल्यास, iQOO Z9 Lite 5G देखील तुम्हाला निराश करणार नाही. मात्र, तुम्ही तुमच्या गरजा आणि आवडीनुसार स्मार्टफोनची निवड करावी.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo