AI रियर कॅमेरासह लेटेस्ट iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
IQOO कंपनीचा लेटेस्ट IQOO Z9 Lite 5G भारतीय बाजारात लाँच
IQOO Z9 Lite 5G स्मार्टफोन बजेट किमतीत सादर करण्यात आला आहे.
IQOO Z9 Lite 5G फोनमध्ये AI रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध
iQOO Z9 Lite 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड IQOO ने आपला नवीन फोन IQOO Z9 Lite 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनच्य भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती, आता अखेर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी 50MP कॅमेरा आहे. लेटेस्ट iQOO Z9 Lite 5G हे बजेट विभागातील Xiaomi, Realme आणि Oppo सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनशी जबरदस्त स्पर्धा करणार आहे.
iQOO Z9 Lite 5G ची भारतीय किंमत
Introducing the #iQOOZ9Lite with the power of #FullyLoaded5G, MediaTek Dimensity 6300 5G processor, 50 MP Sony AI Camera, and more starting at ₹9,999*.
— iQOO India (@IqooInd) July 15, 2024
Sale goes live on 20th July @amazonIN & https://t.co/75ueLp6Bm1
Know More – https://t.co/Bmry7cikIy #AmazonSpecials #iQOO… pic.twitter.com/rIVee50MM7
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताने iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोन 4GB+128GB आणि 6GB+128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची किंमत अनुक्रमे 10,499 रुपये आणि 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 500 रुपयांच्या सवलतीसह हे दोन्ही मॉडेल्स 9,999 आणि 10,999 रुपयांना खरेदी करता येतील. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Amazon India वर 20 जुलैपासून सुरू होणार आहे.
iQOO Z9 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच लांबीचा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या फोनला धूळ आणि पाणी प्रतिरोधक म्हणून IP64 रेटिंग मिळाले आहे. त्याबरोबरच, हा फोन Android 14 आधारित Funtouch 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कंपनीने या फोनमध्ये AI रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स आणि 2MP बोकेह सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 8MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये iQOO Z9 Lite मध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. फोन पूर्ण चार्ज केल्यावर 9 तास गेमिंग, 23 तास बिंज-वॉचिंग, 32 तास सोशल मीडिया आणि 84 तास म्युझिक प्लेबॅक टाइमसाठी दावा करण्यात आला आहे.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या नवीन स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे. चांगल्या ऑडिओसाठी नवीन मोबाइल फोनमध्ये डायनॅमिक ऑडिओ बूस्टरसह चांगला स्पीकर प्रदान करण्यात आला आहे, जो आवाज 150% वाढवतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile