प्रतीक्षा संपली! iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Updated on 12-Mar-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच

ICICI आणि HDFC बँक कार्डांवर 2000 रुपयांची सवलत

iQOO Z9 5G फोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड देण्यात आला आहे.

iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे केली जाईल. हा या विभागातील सर्वात वेगवान स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा फोन ब्राईट AMOLED डिस्प्लेसह येतो. त्याबरोबरच, हँडसेट 7.88mm अल्ट्रा स्लिम आहे. हा फोन उत्तम गेमिंग अनुभवासह येतो. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन.

हे सुद्धा वाचा: Airtel युजर्सना धक्का! कंपनीने दोन Popular प्लॅन्सच्या किमती वाढवल्या, बघा नवीन किंमत। Tech News

iQOO Z9 India Price ahead of launch

iQOO Z9 5G ची किंमत

iQOO Z9 5G स्मार्टफोन भारतात 19,999 रुपयांपासून लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या टॉप वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI आणि HDFC बँक कार्डांवर 2000 रुपयांची सवलत दिली जाईल. यानंतर हा फोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. iQOO Z9 5G स्मार्टफोन Graphene Blue आणि Brushed Green या दोन कलर ऑप्शन्समध्ये आणला गेला आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची सेल 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजता Amazon वर सुरू होईल. हा सेल फक्त प्राइम सदस्यांसाठी असेल. तर, सर्व वापरकर्त्यांसाठी 14 मार्चपासून विक्री सुरू होणार आहे.

iQOO Z9 5G

iQOO Z9 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात अल्ट्रा गेमिंग मोड देण्यात आला आहे. हा फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर चालतो. फोन पाण्याच्या प्रतिकारासाठी 1P54 रेटिंगसह आणले गेले आहे. तर, सुरक्षिततेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय, 2MP पोर्ट्रेट लेन्स देखील उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हे 44W फ्लॅशचार्जला सपोर्ट करते. फोन 8GB रॅमसह येतो. चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :