iQOO ने नुकतेच म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी भारतात iQOO Neo 9 Pro ची घोषणा केली. हा फोन लाँच झाल्यानंतर, कंपनी भारतात आणखी एक नवीन फोन आणण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून आगामी iQOO Z9 5G चे लाँच टीज करत आहे. फोनचे लँडिंग पेज मागील आठवड्यापासून Amazon वर उपलब्ध आहे, परंतु कंपनीने त्याची लॉन्च तारीख उघड केली नव्हती. मात्र, आज ब्रँडने अधिकृतपणे iQOO Z9 5G भारतीय लाँच तारखेचे डेट जाहीर केली आहे.
iQOO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे की, iQOO Z9 5G भारतात 12 मार्च रोजी लाँच करण्यात येईल. याशिवाय, iQOO Z9 5G हा त्याच्या विभागातील पहिला फोन असेल, ज्यामध्ये OIS-सक्षम Sony IMX882 50MP प्रायमरी कॅमेरा असेल. याबाबत ब्रँडकडून पुष्टी करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर, फोन मीडियाटेक डायमेंसिटी 7200 SoC सह आपला नवीन Z-सीरीज स्मार्टफोन सादर करेल.
आगामी iQOO Z9 5G च्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा डिवाइस 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. हे उपकरण भारतात ब्लु आणि ग्रीन कलरमध्ये येण्याची शक्यता आहे.
iQOO Z9 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा 1.5K OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटसह येऊ शकतो. त्याबरोरबच, लीकनुसार हा फोन MediaTek Dimensity 7200 चिपसेटसह लाँच केला जाईल. फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. फोनमध्ये LED फ्लॅशसह डुअल रियर कॅमेरा असेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा Sony IMX882 OIS कॅमेरा सेंसर असेल. तसेच, 6000mAh ची मोठी बॅटरी असेल. मात्र, या फोनची किंमत आणि संपूर्ण तपशील 12 मार्च रोजीच अधिकृतपणे जाहीर केले जातील.