लेटेस्ट iQOO Z9 5G ची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, मिळेल प्रचंड Discount। Tech News 

लेटेस्ट iQOO Z9 5G ची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, मिळेल प्रचंड Discount। Tech News 
HIGHLIGHTS

नवीनतम iQOO Z9 5G फोनची भारतात आजपासून पहिली विक्री

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट

उत्तम गेमिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट आहे.

iQOO ने गेल्या आठवड्यात आपला लेटेस्ट iQOO Z9 5G या स्मार्टफोन लाँच केला. त्यानंतर फोनची पहिली सेल आज म्हणजेच 14 मार्च रोजी आहे. जी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. जर आपण या फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात पॉवरफुल प्रोसेसर आणि जलद चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल. हँडसेटमध्ये व्हर्च्युअल रॅम, OIS सपोर्टिंग कॅमेरा आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे. चला तर मग जाणून घ्या iQOO Z9 5G फोनची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: OnePlus चा नवीन Flagship Killer ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, बघा काय मिळेल विशेष? Tech News

iQOO Z9 5G
iQOO Z9 5G

iQOO Z9 5G किंमत आणि ऑफर

IQOO Z9 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. त्याचा 8GB + 256GB व्हेरिएंट 21,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, फोनवर 1,067 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI आणि 19,850 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

iQOO Z9 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Z9 5G या डिव्हाइसमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. हा फोन नवीनतम Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. उत्तम गेमिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 चिपसेट आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, विस्तारित रॅम, 8GB RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.

iQOO Z9 5G features 2024
iQOO Z9 5G features 2024

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS आणि EIS ला सपोर्ट करणारी 50MP प्रायमरी लेन्स आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सर आहे. यामध्ये फ्लॅश लाइट देखील प्रदान केला गेला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 44W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरक्षेसाठी हँडसेटमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. यात अखंड कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे. पाण्याच्या प्रतिकारासाठी फोनला 1P54 रेटिंग देखील मिळाले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo