iQOO चा नवीन iQoo Z7 Pro स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा त्याच्या सेगमेंटमधील सर्वात थिन आणि स्लिम स्मार्टफोन आहे. त्याबरोबरच, फोन लिक्विड कूलिंग सिस्टम सपोर्टसह येतो. फोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड देण्यात आला आहे. तसेच मोशन कंट्रोल, इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे.
डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन जो 3D कर्व डिस्प्लेसह येतो. त्याची जाडी 7.36 मिमी आहे. तर वजन 174 ग्रॅम आहे. फोनच्या मागील बाजूस AG ग्लास वापरण्यात आला आहे, जो अँटी फिंगरप्रिंटसह येतो. चला तर मग जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
iQOO Z7 Pro स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 24,999 रुपयांना येतो. फोनची विक्री 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि IQOO च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो. SBI कार्डवरून फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 21,999 रुपये आणि 22,999 रुपये होईल.
IQOO Z7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट सपोर्ट 120Hz आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ग्लास प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. फोंम्हद्ये सेकंड जनरेशन 4nm प्रोसेस MediaTek Dimensity 7200 5G मोबाईल चिपसेट देण्यात आला आहे. हा प्रोसेसर गेम, ऍप्स आणि दैनंदिन क्रियाकलापांसाठी उत्कृष्ट कार्यप्रदर्शन प्रदान करते. फोनमध्ये 8 GB रॅम आहे. तसेच 8 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 आधारित Funtouch OS वर काम करतो.
फोनमध्ये 4600mAh ची मोठी बॅटरी आहे. फोनसोबत 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन 22 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. फोन IP रेटिंग IP52 सह येतो. फोनमध्ये 105G बँड देण्यात आले आहेत. तसेच, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 साठी समर्थन उपलब्ध आहे.
फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. त्याचा मेन कॅमेरा 64MP आहे, जो Aura Light आणि OIS सह येतो. Aura Light फिचर आणि पोर्ट्रेट मोड तुम्हाला स्टुडिओ सारखी लाईट्स आणि पोर्ट्रेट एन्हासिंग फीचर्स देण्यासाठी एकत्र काम करतात, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. यासह नाईट फोटोग्राफी उत्तम होईल. याशिवाय 2MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोर 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये पोर्ट्रेट मोड, लो-लाइट पोर्ट्रेट मोडचे पर्याय देण्यात आले आहेत.