iQOO Z7 Pro Sale: नवीनतम स्मार्टफोनची सेल भारतात सुरू, बघा किंमत, ऑफर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 Pro Sale: नवीनतम स्मार्टफोनची सेल भारतात सुरू, बघा किंमत, ऑफर्स आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्स
HIGHLIGHTS

भारतात iQOO Z7 Pro ची सेल आजपासून सुरू झाली आहे.

iQOO Z7 Pro 5G Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

SBI आणि HDFC बँकेकडून ग्राहकांना फोनवर 2000 रुपयांची झटपट सूट

गेल्या महिन्यात म्हणजेच नुकतेच iQOO ने भारतीय बाजारात iQOO Z7 Pro 5G नवीनतम स्मार्टफोन लाँच केला. iQOO Z7 Pro डिझाइन अप्रतिम आहे. याशिवाय, मागील जनरेशनच्या फोनच्या तुलनेत या फोनमध्ये बरेच काही नवीन आहे. लेटेस्ट iQOO फोनमध्ये तुम्हाला एक कर्व डिस्प्ले मिळत आहे, याशिवाय फोनमध्ये रिंगसारखा LED फ्लॅश देखील देण्यात आला आहे. भारतात iQOO Z7 Pro ची सेल आजपासून सुरू झाली आहे. iQOO Z7 Pro 5G Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

भारतातील iQOO Z7 Pro 5G ची किंमत

 iQOO Z7 Pro च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची भारतीय किंमत सुमारे 23,999 रुपये आहे. एवढेच नाही तर फोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. 

iqoo z7 pro 5g

पहिल्या सेलमधील ऑफर्स

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास SBI आणि HDFC बँकेकडून ग्राहकांना फोनवर 2000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना 2000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ब्लू लगून आणि ग्रेफाइट मॅट या दोन कलर ऑप्शन्समध्ये फोन खरेदी करू शकता. दोन्ही कलर व्हेरिएंट सध्या Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

 iQOO Z7 Pro 5G

iQOO Z7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ही स्क्रीन FHD+ रिझोल्यूशनवर चालते. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळत आहे. MediaTek Dimensity 7200 octa-core प्रोसेसरसह, iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन शक्तिशाली स्मार्टफोनच्या श्रेणीमध्ये बसला आहे. हा प्रोसेसर गेम, ऍप्स आणि दैनंदिन ऍक्टिव्हिटीजसाठी उत्कृष्ट कार्यप्रदर्शन प्रदान करते. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्यतिरिक्त, या फोनमध्ये 256GB स्टोरेज देखील आहे. तुम्ही 16GB पर्यंत रॅम देखील वाढवू शकता.

iQOO Z7 Pro 5G डुअल कॅमेरा सेटअप ऑफर करतो. या फोनमध्ये 64MP मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सहायक दुय्यम कॅमेरा देखील उपलब्ध आहे. उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे तुम्हाला इमेजची पिक्सेल संरचना दृश्यमान होण्याची चिंता न करता मोठ्या प्रिंट किंवा क्रॉप शॉट्स बनविण्याची परवानगी देतात. एवढेच नाही तर फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. 

याशिवाय, iQOO Z7 Pro 5G बॅटरी तपशीलाबद्दल बोलायचे तर फोनमध्ये 4600mAh बॅटरी उपलब्ध आहे. 4600mAh बॅटरी किमान 4.5 तास चालेल. एका तासापेक्षा कमी वेळेत ही बॅटरी फुल चार्ज होण्याची क्षमता ठेवते. हा फोन Android 13 वर आधारित FunTouch OS 13 वर सादर करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo