iQOO ने भारतात त्याचा मध्यम श्रेणीचा फोन iQOO Z7 5G फोन सादर केला आहे. iQOO Z7 5G ला 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट, MediaTek Dimensity 920 प्रोसेसर, 90Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले, 64MP मुख्य कॅमेरा (OIS सपोर्टसह) मिळतो. हे उपकरण आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : Airtelचे स्वस्त प्रीपेड प्लॅन्स! मिळेल 5G डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि बरेच काही
iQOO Z7 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. याशिवाय, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. HDFC किंवा SBI कार्डधारकांना कंपनी 1,500 रुपयांची सवलत देखील देत आहे.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड दोन्ही सवलत मिळण्यास पात्र आहेत. डिस्काउंटनंतर iQOO Z7 5G ची किंमत 17,499 रुपये असेल. Amazon India आणि iQOO च्या स्वतःच्या वेबसाइटवर दुपारी 1 वाजतापासून सेल सुरू झाली आहे. पॅसिफिक नाईट आणि नॉर्वे ब्लू या दोन रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.
iQOO Z7 5G ला 6.38-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळत आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिव्हाइसमध्ये वॉटरड्रॉप नॉचमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (OIS सह) आणि 2-मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे.
iQOO Z7 5G ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 920 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी USB Type-C पोर्टद्वारे 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 13 वर आधारित FunTouchOS 13 वर काम करतो.