Amazon होळी ऑफर ! 30 हजारांचा iQOO फोन फक्त 6 हजारात खरेदी करा, जबरदस्त फीचर

Updated on 02-Mar-2023
HIGHLIGHTS

iQOO Z6 Pro 5G वर प्रचंड सूट

Amazon वर 20% सवलतीसह फोन खरेदीसाठी उपलब्ध

तसेच, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला iQOO Z6 Pro 5G बद्दल सांगणार आहोत. या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. यासोबतच Amazon वरून खरेदी करण्यावर भरघोस सूटही उपलब्ध आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात तुम्हाला बंपर डिस्काउंट कसा मिळेल? चला बघुयात… 

हे सुद्धा वाचा : होळीपूर्वी 'या' ऑनलाइन वेबसाइट्सवर मोठ्या सवलती उपलब्ध, बघा यादी

किंमत :

iQOO Z6 Pro 5G (8GB+128GB) ची MRP 29,990 रुपये आहे आणि तुम्ही 20% सवलतीनंतर 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ICICI बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 3 हजार रुपयांची सूट मिळत आहे. मात्र यासाठी किमान 5000 रुपयांची शॉपिंग करावी लागणार आहे. 

याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत सर्वात मोठी सूट उपलब्ध आहे. जुना स्मार्टफोन Amazon ला परत करून तुम्हाला 18,050 रुपयांची सूट मिळू शकते. मात्र, पूर्ण सूट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती ठीक असावी आणि मॉडेल नवीनतम असण्याची गरज आहे. 

संपूर्ण सूट मिळाल्यास हा फोन तुम्हाला 5,949 रुपयांना तुमचा होईल.

iQOO Z6 Pro स्पेसिफिकेशन्स

iQOO Z6 Pro लाँच होताच ट्रेंडमध्ये आला. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन 66W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 64MP ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. याला 1300 निट्स ब्राइटनेस मिळतो. हा फोन तुम्ही सहज खरेदी करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :