iQoo कडील आगामी स्मार्टफोन iQoo Z6 Lite 5G चे कॅमेरा आणि बॅटरी फिचर लॉन्च होण्यापूर्वी पुष्टी केली गेली आहे. नवीनतम अपडेटमध्ये असे म्हटले आहे की, iQoo Z6 Lite 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा असेल जो फोनचा प्रायमरी लेन्स देखील असेल. आय ऑटो फोकस आणि LED फ्लॅश हे त्याचे खास फिचर आहे. तसेच, फोनची बॅटरी क्षमता 5000mAh असेल, याची देखील पुष्टी केली गेली आहे. यासोबतच 18W फास्ट चार्जिंग दिले जाईल. अलीकडेच, कंपनीने या फोनच्या प्रोसेसरबद्दल घोषणा केली आहे की, यात क्वालकॉम कडून नुकताच लाँच केलेला स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 SoC असेल.
हे सुद्धा वाचा : मस्तचं ! सर्वोत्कृष्ट TWS Earbuds 1000 रुपयांअंतर्गत लाँच, 14 तास नॉन-स्टॉप म्युझिकचा आनंद घ्या
iQoo Z6 Lite 5G साठी एक मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह झाली आहे. यावर फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील अपडेट केले गेले आहेत, त्यानुसार स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलची प्राइमरी लेन्स असेल. फोनमध्ये 240Hz चा टच सॅम्पलिंग रेट सांगण्यात आला आहे. Vivo च्या सब-ब्रँड iQoo ने या फोनबद्दल आणखी एक दावा केला आहे की तो 127 तास म्युझिक प्लेबॅक, 18.51 तास YouTube प्लेबॅक, 8.3 तास गेमिंग आणि 21.6 तास सोशल मीडिया ऍप ब्राउझिंग देऊ शकतो.
कंपनीने अलीकडेच त्याच्या आत Qualcomm Snapdragon 4 Gen 1 SoC ची घोषणा केली आहे. या चिपबद्दल असे सांगण्यात आले आहे की, ती MediaTek Dimensity 700 SoC पेक्षा अधिक पावरफुल आहे. तसेच, ते Qualcomm Snapdragon 6 Gen1 SoC च्या तुलनेत खूप पुढे आहे.
iQoo Z6 Lite 5G चे लाँच भारतात 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. फोनचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फ्रंटला तो वॉटर ड्रॉप नॉच डिझाइनसह येईल, ज्यात सेल्फी कॅमेऱ्याला देखील बसेल, असे म्हटले जाते.