हा जगातील पहिला Qualcomm Snapdragon 4 Gen 1 स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे.
iQOO ने जगातील पहिला Qualcomm Snapdragon 4 Gen 1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनला iQOO Z6 Lite 5G असे नाव देण्यात आले आहे. या फोनचे खास फिचर म्हणजे त्याचा 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 120Hz FHD+ डिस्प्ले होय. iQOO Z6 Lite 5G फोन आज 14 सप्टेंबर रोजी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ही सेल Amazon आणि iQOO.com वर आज दुपारी 12:15 वाजता सुरु होणार आहे. फोनवर 2500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट उपलब्ध आहे.
iQOO Z6 Lite दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 4GB RAM + 64GB ची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 6GB RAM + 128GB ची किंमत 15,499 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये SBI कार्डने हा फोन खरेदी केल्यास 2,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. फोनसोबत 399 रुपयांमध्ये 18W कंपॅटिबल चार्जर दिला जात आहे. हा फोन स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाईट या दोन स्टायलिश कलर पर्यायांमध्ये येतो.
iQOO Z6 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Z6 Lite 5G नवीनतम Snapdragon 4 Gen 1 मोबाइल प्लॅटफॉर्म प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट आहे. नवीन फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठ्या 5000mAh बॅटरीसह येतो. यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
iQOO Z6 Lite 5G मध्ये 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.58-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, iQOO Z6 Lite 5G अल्ट्रा गेम मोडसह देखील येतो. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP आय ऑटोफोकस मेन कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.