प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या आगामी स्मार्टफोन iQOO Z10 5G ची लाँच तारीख पुढे आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन 10 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने लाँच होण्यापूर्वीच स्मार्टफोनला टीझ करणे सुरू केले आहे. एवढेच नाही तर, या स्मार्टफोनची खास फीचर्स देखील समोर आली आहेत. अलीकडेच कंपनीने स्मार्टफोनचे नवे टीझर जाहीर केले आहे. यामध्ये फोनची डिझाईन आणि इतर माहिती देखील पुढे आली आहे.
Also Read: Price Drop! आगामी फोनच्या लाँचपूर्वीच Motorola Edge 50 Fusion च्या किमतीत घसरण, पहा डील
iQOO इंडियाने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवरून ट्विट करून डिझाईन उघड केली आहे. iQOO Z10 5G फोनच्या मागील बाजूस मॅट फिनिश दिसणार आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक मोठा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आल्याचे टीझरमध्ये दिसून येते. तसेच, कॅमेरा मॉड्यूलमध्ये फ्लॅश देखील दिला आहे. तर, iQOO ब्रँडिंग खालील बाजूस दिली जाते.
त्याबरोबरच, स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्स उघड केले आहेत. कंपनी हा स्मार्टफोन स्टेलर ब्लॅक आणि ग्लेशियर व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कॅमेरा मॉड्यूलवरून असे दिसून येते की, मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करू शकतो. iQOO ने अलीकडेच त्यांच्या पोस्टमध्ये स्नॅपड्रॅगनच्या अकाउंटला टॅग केले आहे, आगामी डिव्हाइस क्वालकॉम SoC द्वारे समर्थित असू शकते, अशी अपेक्षा आहे.
कंपनीने आधीच खुलासा केला आहे की, या हँडसेटमध्ये 7300mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तर, ताज्या लीकनुसार, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड-कर्व्हड AMOLED डिस्प्ले मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 SoC, 50MP मुख्य कॅमेरा, 90W चार्जिंग आणि बरेच काही असेल. मात्र फोनबद्दल योग्य माहिती, हा फोन लाँच झाल्यावरची पुढे येईल.