Revealing! iQOO Neo 9 Pro ची रॅम आणि कॅमेरा स्पेक्स उघड, फोटोग्राफीचा मिळेल उत्तम अनुभव फेब्रुवारीमध्ये होणार लाँच। Tech News

Updated on 26-Jan-2024
HIGHLIGHTS

iQOO Neo 9 Pro पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होणार

iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारी 2024 रोजी भारतात लाँच होईल.

हा स्मार्टफोन लेटेस्ट OnePlus 12R ला स्पर्धा देऊ शकतो.

iQOO Neo 9 Pro पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये भारतात लाँच होणार आहे. या आगामी स्मार्टफोनशी संबंधित अनेक रिपोर्ट्स ऑनलाइन लीक झाले आहेत, ज्यामध्ये त्याचे फीचर्स समोर आले आहेत. आता कंपनीने या डिव्हाईसच्या रॅम आणि स्टोरेजसह प्रायमरी कॅमेरा देखील उघड केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, IQOO Neo 9 Pro गेल्या महिन्यात चीनी इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये लाँच करण्यात आला होता.

iQOO Neo 9 Pro

iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारी 2024 रोजी भारतात लाँच होईल. लीकनुसार, या फोनची किंमत 35 हजार ते 40 हजार दरम्यान ठेवली जाऊ शकते. हे नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 12R ला टक्कर देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा: Vodafone Idea ची रिपब्लिक डे ऑफर! सवलतीसह मिळणार तब्बल 50GB डेटा Free, बघा Best ऑफर

iQOO Neo 9 Pro चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोन ब्रँड iQOO नुसार iQOO Neo 9 Pro दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 8GB + 256GB आणि 12GB + 256GB स्टोरेजमध्ये ऑफर केला जाईल. त्याबरोबरच, उत्कृष्ट फोटो क्लिक करण्यासाठी फोनमध्ये 50MP Sony IMX920 सेन्सर असेल, जो Vivo X100 मध्ये उपस्थित आहे. याशिवाय, हँडसेटच्या इतर फीचर्सशी संबंधित कोणतीही माहिती मिळालेली नाही.

याव्यतिरिक्त, आत्तापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स आणि लीकनुसार, हा स्मार्टफोन 144Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्लेने सुसज्ज असू शकतो. IQOO Neo 9 Pro च्या भारतीय व्हेरिएंटमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर प्रदान केला जाईल. यासह वापरकर्त्यांना फोनमध्ये स्मूद गेमिंग अनुभव मिळेल. हा फोन ग्राहकांना फायरी रेड आणि कॉन्कर ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.

IQOO च्या आगामी स्मार्टफोनमध्ये 5,160mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइल Wi-Fi, ड्युअल सिम स्लॉट, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट प्रदान केले जाईल. हा फोन Android 14 वर काम करेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :