Price Cut! iQOO Neo 9 Pro 5G च्या किमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि सर्व तपशील। Tech News 

Price Cut! iQOO Neo 9 Pro 5G च्या किमतीत कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि सर्व तपशील। Tech News 
HIGHLIGHTS

iQOO ने अलीकडेच iQOO Neo 9 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला.

लाँचच्या सहा महिन्यांच्या आत iQOO ने लेटेस्ट स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली.

iQOO Neo 9 Pro 5G च्या व्हेरिएंट्समध्ये 1000 रुपयांची कपात

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच iQOO Neo 9 Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये चांगले फोन लाँच करत आहे. कंपनीने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात iQOO Neo 9 Pro लाँच केला होता. लाँचच्या सहा महिन्यांच्या आत iQOO ने लेटेस्ट स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. जाणून घेऊयात iQOO Neo 9 Pro 5G ची नवी किंमत-

Also Read: Xiaomi Super Saver Sale: कंपनीच्या नव्या सेलची घोषणा स्वस्त दरात स्मार्टफोन्स आणि TV उपलब्ध, बघा Best ऑफर

iQOO Neo 9 Pro 5G ची नवी किंमत

iQOO Neo 9 Pro फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. आता या फोनच्या किमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. कपातीनंतर 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह हा व्हेरिएंट 34,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

iqoo neo 9 pro smartphones
iqoo neo 9 pro smartphones

त्याबरोबरच, 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1000 रुपयांनी कमी करून 36,999 रुपये झाली आहे. तर, 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 38,999 रुपयांना उपलब्ध असेल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनसह ICICI बँक कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल.

iQOO Neo 9 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 9 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP + 8MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी यात 5160mAh बॅटरी प्रदान केली गेली आहे, जी 120W चार्जिंगला समर्थन देईल. हा फोन 9 मिनिटांत 40 टक्के चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo