iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होणार आहे. मात्र अधिकृत लाँचपूर्वी कंपनीने या स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु केली आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. स्मार्टफोनच्या कन्फर्म स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, iQOO फोनमध्ये Qualcomm चा पॉवरफुल प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे. बघुयात आगामी स्मार्टफोनचे प्री-बुकिंग तपशील-
कंपनीने सांगितले की, iQOO Neo 9 Pro चे प्री-बुकिंग आज दुपारी 12 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सुरू झाली आहे. प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना 1,000 रुपयांची बँक सवलत दिली जाईल. याशिवाय, फोनवर 2 वर्षांची वॉरंटीही मिळणार आहे. मात्र, यात iQOO Neo 9 Pro च्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, लीक्सनुसार या स्मार्टफोनची किंमत भारतात 34,999 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Amazon सूचीनुसार, आगामी iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 6.78 इंच लांबीच्या डिस्प्लेसह सुसज्ज असणार आहे. तर, वर सांगितल्याप्रमाणे अप्रतिम परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात येत आहे. तसेच, कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास 50MP कॅमेरा मिळणार आहे. हा फोन मोठ्या 5160mAh बॅटरीसह येईल. यात 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
याव्यतिरिक्त, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी iQOO ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट इ. फीचर्स मिळतील. हा मोबाइल फोन Android 14 वर काम करेल. सिक्योरिटीसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असेल. मात्र, फोनची नक्की किंमत आणि इतर सर्व फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरच कन्फर्म होतील.