तारीख नोट करा! आगामी iQOO Neo 9 Pro ची लाँच डेट जाहीर, Powerful प्रोसेसर आणि फीचर्ससह येईल नवा स्मार्टफोन। Tech News 

तारीख नोट करा! आगामी iQOO Neo 9 Pro ची लाँच डेट जाहीर, Powerful प्रोसेसर आणि फीचर्ससह येईल नवा स्मार्टफोन। Tech News 
HIGHLIGHTS

iQOO Neo 9 Pro कंपनीचा आगामी स्मार्टफोनचे भारतीय लाँच

हा स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल.

या आगामी फोनची किंमत सुमारे 40 हजार रुपये ठेवली जाऊ शकते.

iQOO Neo 9 Pro कंपनीचा आगामी स्मार्टफोन लवकरच भारतात येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा स्मार्टफोन गेल्या यावर्षी चीनमध्ये सादर करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोन भारतीय प्रक्षेपण तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आगामी स्मार्टफोनमध्ये एक अद्वितीय कॅमेरा मॉड्यूल आणि लेदर फिनिश बॅक पॅनेल असेल. तसेच, स्मूथ फंक्शनिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm चा पॉवरफुल प्रोसेसर Snapdragon 8 Gen 2 दिला जाईल. चला तर मग बघुयात आगामी स्मार्टफोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स.

iQOO Neo 9 Pro इंडिया लाँच

कंपनीने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर पोस्ट शेअर करत iQOO Neo 9 Pro च्या भारतीय लाँचची तारीख जाहीर केली आहे. iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारी 2024 ला लाँच केला जाईल. या फोनच्या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीम अधिकृत यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलवर बघता येईल.

iQOO Neo 9 Pro ची संभाव्य किंमत

स्मार्टफोन निर्माता iQOO ने आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाही. अलीकडील लीक्सवर विश्वास ठेवला तर, या आगामी फोनची किंमत सुमारे 40 हजार रुपये ठेवली जाऊ शकते. आगामी स्मार्टफोन OnePlus, Redmi आणि Oppo सारख्या ब्रँडच्या फोनशी स्पर्धा करेल, असे देखील म्हटले जात आहे.

iQOO Neo 9 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स

iQOO Neo 9 Pro Design

अलीकडेच पुढे आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर, iQOO Neo 9 Pro फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचे रिफ्रेश रेट 144Hz असेल. सुरक्षिततेसाठी, डिव्हाइसमध्ये फेस अनलॉकसह फिंगरप्रिंट सेन्सर असेल. फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP मेन लेन्स आणि 8MP सेकंडरी सेन्सर आणि सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याची बॅटरी 5,160mAh असू शकते, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आगामी फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC, हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट दिले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo