आगामी iQOO Neo 9 Pro सुरुवातीची किंमत लीक! स्मार्टफोनचे Important फीचर्स देखील उघड। Tech News

Updated on 07-Feb-2024
HIGHLIGHTS

iQOO Neo 9 Pro चीनमध्ये डिसेंबर 2023 मध्ये लाँच केला गेला.

हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होणार आहे.

iQOO Neo 9 Pro सुरुवातीची अपेक्षित किंमत लीक

iQOO चा आगामी स्मार्टफोन iQOO Neo 9 Pro चीनमध्ये गेल्या वर्षी म्हणेजच डिसेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होणार आहे. लाँचपूर्वी स्मार्टफोनची मायक्रो साइट शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. या मायक्रोसाईटद्वारे स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या डिस्प्ले, बॅटरी आणि फास्ट चार्जिंगबद्दल माहिती उघड झाली आहे. तसेच, फोनची अपेक्षित किंमत देखील ऑनलाईन लीक झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात iQOO Neo 9 Pro ची अपेक्षित किंमत आणि सर्व लीक्स-

हे सुद्धा वाचा: बहुप्रतिक्षीत Xiaomi 14 सिरीजची अधिकृत लॉन्च डेट कन्फर्म! मिळतील सर्वात Powerful फीचर्स। Tech News

iQOO Neo 9 Pro ची लीक किंमत

iQOO Neo 9 Pro

लक्षात घ्या की, स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने अद्याप Neo 9 Pro च्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु लीकवर विश्वास ठेवला तर, या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन अनेक कलर ऑप्शन्स आणि स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. यामुळे Xiaomi, Oppo, Realme आणि Samsung सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सना बाजारात जबरदस्त स्पर्धा मिळणार आहे.

iQOO Neo 9 Pro चे कन्फर्म फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Amazon लिस्टिंगनुसार, iQOO Neo 9 Pro फोन 6.78-इंच लांबीच्या LTP AMOLED डिस्प्लेसह येईल. या डिस्प्लेचा रीफ्रेश रेट 144Hz असेल आणि पीक ब्राइटनेस 300 nits आहे. त्याबरोबरच, सुरळीत कामकाजासाठी आणि स्पीड/मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला जाईल. स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 कालांतराने त्याचे कार्यप्रदर्शन खूप चांगले राखून ठेवते. फोनची वाढलेली उष्णता असूनही त्याची कार्यक्षमता राखली जाते.

फोटोग्राफीसाठी, iQOO च्या नवीन स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. मात्र, फोनच्या सेल्फी कॅमेरा अद्याप समोर आलेला नाही. पॉवरसाठी, डिव्हाइसला मजबूत 5,160mAh बॅटरी दिली जाईल, जी 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, GPS, Wi-Fi, USB टाइप-C पोर्ट आणि ऑडिओ जॅक यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध असतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :