iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार
फोनचे स्पेशल स्पेसिफिकेशन Amazon लिस्टिंगद्वारे उघड झाले आहेत.
फोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मोठी बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा स्पेक्स उपलब्ध
iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहे. स्मार्टफोनच्या लाँचचे पेज प्रसिद्ध Amazon India ई-कॉमर्स वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आले आहे. अलीकडेच फोनचे स्पेशल स्पेसिफिकेशन म्हणजेच प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज Amazon लिस्टिंगद्वारे समोर आले होते. त्यानंतर आता फोनच्या कॅमेरा आणि बॅटरीचा तपशील पुढे आला आहे. याशिवाय स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्सही समोर आले आहेत.
iQOO Neo 9 Pro चे भारतीय लाँच आणि कन्फर्म स्पेक्स
iQOO चा हा स्मार्टफोन 22 फेब्रुवारी 2024 ला लाँच होणार आहे. Amazon वर लाइव्ह झालेल्या फोनच्या मायक्रो वेबसाइटनुसार, फोनची बॅटरी आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.
स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी असेल. हे 120W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनी स्मार्टफोनसोबत चार्जर देखील देऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, PD चार्जर तुमची नोटबुक, मोबाईल फोन आणि इतर उपकरणे लवकर चार्ज करेल. PD म्हणजे पॉवर डिलिव्हरी. PD तंत्रज्ञान मुळात तुमच्या डिव्हाइसला कमी वेळेत अधिक पॉवर घेण्यास सक्षम करते, जे सुपरफास्ट चार्जिंगमध्ये भाषांतरित होते.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यात OIS सपोर्टसह 50MP Sony IMX920 मेन लेन्स असेल. त्याबरोबरच, फोन 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह येईल. हा स्मार्टफोन फियरी रेड आणि कॉन्करर ब्लॅक या कलर ऑप्शन्समध्ये आणला जाईल.
iQOO Neo 9 Pro चे इतर तपशील
वर सांगितल्याप्रमाणे, अलीकडेच फोनचे स्पेशल स्पेसिफिकेशन म्हणजेच प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज Amazon लिस्टिंगद्वारे समोर आले होते. त्यानुसार, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. तसेच स्टोरेज सेक्शन्समध्ये, 8GB रॅम आणि 12GB रॅमचा पर्याय असेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज देखील आहे. याशिवाय फोनमध्ये Q1 गेमिंग चिप उपलब्ध असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.