iQOO चा iQOO Neo 9 Pro 5G स्मार्टफोन दीर्घ प्रतीक्षेनंतर आज म्हणजेच 22 फेब्रुवारी 2024 रोजी लाँच झाला आहे. कंपनीने हा मिड-रेंज स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्ससह आणला आहे. यात 144Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनची विक्री लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon च्या माध्यमातून केली जाणार आहे. लाइव्ह इव्हेंटद्वारे हा फोन सादर करण्यात आला आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-
iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचा बेस 8GB रॅमसह 128GB स्टोरेज व्हेरिएंट 35,999 रुपयांना लाँच केला आहे. तर, 8GB रॅम + 256GB स्टोरेजसह व्हेरिएंट 37,999 रुपयांना येतो. अखेर फोनचा 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह टॉप वेरिएंटची किंमत 39,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
पहिल्या सेलमध्ये iQOO Neo 9 Pro 5G वर 2000 रुपयांची सूट आहे. ही ऑफर HDFC आणि ICICI बँक कार्डवर आहे. लक्षात घ्या की, 26 फेब्रुवारीपर्यंत मेमरी अपग्रेड ऑफर 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटसाठी उपलब्ध आहे. या फोनची विक्री 21 मार्चपासून Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल. प्री-बुकिंग करणारे ग्राहक आज दुपारी 1 वाजल्यापासून ते खरेदी करू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोनची विक्री आधीच सुरु करण्यात आली होती.
फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा पंच होल फुल HD+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी, त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनच्या सिक्योरिटीसाठी फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी, त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 12GB पर्यंत रॅमसह 256GB स्टोरेज आहे. फोनमध्ये रॅम वाढवण्याचाही पर्याय आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP Sony IMX920 मुख्य सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनीने यात 5160mah ची बॅटरी दिली आहे, जी 120W फ्लॅशचार्ज सपोर्टसह येते. फोनला 50% चार्ज होण्यासाठी 11 मिनिटे लागतात.