बरेच दिवसांपासून टेक विश्वात iQOO च्या लेटेस्ट iQOO Neo 9 सिरीजची चर्चा सुरु होती आणि अखेर हे सिरीज लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सीरिजअंतर्गत iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro असे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. ही सिरीज तब्बल 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह लाँच करण्यात आली आहे. हे दोन्ही फोन iQOO Neo 8 सीरीजचे अपग्रेडेड व्हर्जन आहेत. लक्षात घ्या की, हे दोन्ही फोन प्रीमियम फीचर्ससह येतात. जाणून घेऊयात दोन्ही फोनच्या किमती आणि अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
iQOO Neo 9 फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच 26,999 रुपये इतकी आहे. तर, 16GB + 1TB टॉप मॉडेल CNY 3199 म्हणेजच 37,291 रुपयांमध्ये येते.
याव्यतिरिक्त, Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3199 म्हणजेच 37,999 रुपये आहे. तर, 16GB + 1TB टॉप मॉडेलची किंमत CNY 3999 म्हणजेच 46,617 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे दोन्ही फोन रेड आणि व्हाईट सोल कलर ऑप्शनमध्ये सादर केले आहेत.
कंपनीने iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.78 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. त्याबरोबरच, हा डिस्प्ले 1.5K रिझोल्युशन पिक्सेलसह येतो.
iQOO Neo 9 फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तर, प्रो मॉडेल डायमेन्सिटी 9300 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. दीर्घ गेमिंग सत्रांदरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी, यात 6K VC लिक्विड कूलिंग 3D प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही फोन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येतात.
फोटोग्राफीसाठी, iQOO Neo 9 सिरीजमध्ये 50MP Sony IMX920 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, कॅमेरा सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देखील देण्यात आला आहे.
तर, प्रो मॉडेलमध्ये तुम्हाला 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी बॅकअपसाठी फोनमध्ये 5,160mAh बॅटरी बसवण्यात आली आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.