iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होणार आहे. निओ सीरीज अंतर्गत हा कंपनीचा दुसरा स्मार्टफोन असेल. अनेक अप्रतिम फीचर्ससह हा स्मार्टफोन 4 जुलै रोजी देशात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. फोनबद्दल बरेच लीक्सदेखील पुढे येत आहेत. आता लाँचआधीच कंपनीने या स्मार्टफोनची प्राईस उघड केली आहे.
वर सांगितल्याप्रमाणे 4 जुलै रोजी भारतात लॉन्च होणाऱ्या iQOO Neo 7 Pro ची किंमत लीक झाली आहे. एका लोकप्रिय टीपस्टरने दावा केला आहे की, कंपनी हा फोन 40,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करेल. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कंपनीने किमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नसली तरी, iQOO ने पुष्टी केली आहे की आगामी स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. जो Adreno 730 GPU ने सुसज्ज असणार आहे. त्याबरोबरच, फोन लेदर फिनिशसह डार्क स्टॉर्म आणि फियरलेस फ्लेम कलर पर्यायांमध्ये आणला जाईल, असेही कंपनीने सांगितले आहे.
आगामी स्मार्टफोनचा अधिकृत टीझरदेखील पुढे आला आहे. या टिझरवरून हे देखील समोर आले आहे की, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वृत्तानुसार, आगामी फोन अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या IQOO Neo 7 Racing Edition चा रिब्रँड केलेला मॉडेल असणार आहे. लिक्सनुसार, फोनमध्ये 50MP Samsung ISOCELL GN5 मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तर, सेल्फीसाठी फोन 16MP फ्रंट कॅमेरासह येऊ शकतो.