बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट गेमिंग स्मार्टफोन आहे. या फोनबद्दल आतापर्यंत आपण बरेच लीक्स आणि अफवा ऐकत आलो आहोत. मात्र, आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनचे मूळ तपशील आणि किंमत सांगणार आहोत.
कंपनीच्या नव्या iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 34,999 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची ठेवण्यात आली आहे. त्याबरोरबच, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. Amazon वर 15 जुलैपासून या फोनची विक्री सुरू होईल.
iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोनवर अर्ली बड ऑफर्स देखील मिळणार आहेत. यासह तुम्ही केवळ 33,999 ते 36,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. त्याबरोरबच, SBI आणि ICICI कार्डद्वारे 2000 रुपयांची झटपट सूट ऑफर दिली जाणार आहे.
iQOO Neo Pro 5G फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे.हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळेल. विशेष म्हणजे हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे. त्यासाठी या फोनमध्ये इंडिपेंडेंट गेमिंग (IG) चिप देखील देण्यात आली आहे. ही चिप मोबाईल गेमर्ससाठी गेमिंगचा अनुभव अप्रतिम करेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा हजर आहे. यात प्रायमरी कॅमेरा 50MP GN5, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. यासोबत OIS सपोर्टही उपलब्ध आहे आणि फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोन 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 2 तास 10 मिनिटे गेम खेळण्याची सुविधा देतो, असा कंपनीचा दावा आहे.