Good News! iQOO Neo 7 5G ची किमतीत तब्बल 4000 रुपयांची घट, आता आणखी Affordable दरात खरेदी करा महागडा स्मार्टफोन  

Good News! iQOO Neo 7 5G ची किमतीत तब्बल 4000 रुपयांची घट, आता आणखी Affordable दरात खरेदी करा महागडा स्मार्टफोन  
HIGHLIGHTS

iQOO Neo 7 5G ची किंमत भारतात कमी करण्यात आली आहे.

फोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 3000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

तर, फोनच्या टॉप व्हेरिएंटच्या किमतीत एकूण 4000 रुपयांची घट झाली आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO च्या लोकप्रिय स्मार्टफोन iQOO Neo 7 5G ची किंमत कमी करण्यात आली आहे. आता हा महागडा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. होय, कंपनीने iQOO Neo 7 स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही सप्टेंबर 2023 मध्ये iQOO ने त्याची किंमत 2000 रुपयांनी कमी केली होती. तर, आता फोनची किंमत तब्बल 4000 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: Limited ऑफर! 200MP कॅमेऱ्यासह येणार Honor 90 5G सेलमध्ये मिळतोय तब्बल 6 हजार रुपयांनी स्वस्त। Tech News

iQOO Neo 7 5G ची नवी किंमत

iQOO Neo 7 ची किंमत सप्टेंबर 2023 मध्ये 2000 रुपयांनी कमी करण्यात आली होती, जी 27,999 रुपयांपासून सुरू झाली होती. तर, टॉप व्हेरिएंट 31,999 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, आता बेस व्हेरियंटची किंमत 3000 रुपयांनी आणि टॉप व्हेरिएंटची 4000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

iqoo neo 7 5G
IQOO Neo 7 5G

नव्या कपातीनंतर, आता iQOO Neo 7 5G ची फोनच्या बेस व्हेरिएंटची नवीन किंमत 24,999 रुपये झाली आहे. तर, टॉप व्हेरिएंटची किंमत 4000 रुपयांनी कमी होऊन 27,999 रुपये झाली आहे. नवीन किंमतीसह फोन अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध देखील करण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन इंटरस्टेलर ब्लॅक आणि फ्रॉस्ट ब्लू या फोन कलर ऑप्शन्समध्ये येतो.

iQOO Neo 7 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. iQOO च्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 5G प्रोसेसर आहे. फोनचा बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि टॉप व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो.

फोनच्या मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 64MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि LED फ्लॅशसह 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. चार्जिंगसाठी यात USB टाइप-C पोर्ट आहे. फोन लॉक आणि अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo