iQoo इंडियाने आपला नवीन फोन iQoo Neo 7 5G भारतात सादर केला आहे. नवीन फोन हा गेल्या वर्षी लाँच झालेल्या iQoo Neo 6 ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर आहे आणि हा प्रोसेसर असलेला भारतात येणारा हा पहिला फोन आहे. iQoo Neo 7 5G ही iQoo Neo 7 SE चे री-ब्रँडेड वर्जन आहे, जे गेल्या वर्षी चीनमध्ये लाँच झाले होते.
हे सुद्धा वाचा : विकेंडला OTTवर 'या' वेब सिरीजचा आनंद घ्या, फक्त बोल्ड सीनचं नाही तर कंटेंटही जबरदस्त
iQoo Neo 7 5G मध्ये Android 13 आधारित Funtouch OS 13 आहे. याशिवाय या फोनमध्ये 6.78 इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1,300 आहे. 4nm MediaTek Dimensity 8200 5G प्रोसेसर, 12 GB LPDDR5 RAM आणि 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali G610 GPU आहे. फोनमध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. गेमिंगसाठी फोनमध्ये ग्रेफाइट 3D कुलिंग सिस्टम आहे.
iQoo Neo 7 5G मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, OTG, NFC, GPS आणि USB टाइप-C साठी समर्थन आहे. फोनमध्ये इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल देखील आहे. यात इंडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. iQoo ने या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी दिली आहे.
iQoo Neo 7 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. यासोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS देखील आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची आहे. समोर 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरासोबत नाईट मोड देखील आहे.
iQoo Neo 7 5G ची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत, 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेजचा एक व्हेरिएंट उपलब्ध असेल. तर, 12 GB रॅमसह 256 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. iQoo Neo 7 5G फ्रॉस्ट ब्लू आणि इंटरस्टेलर ब्लॅक शेड्समध्ये सादर करण्यात आला आहे.
iQoo Neo 7 5G ची विक्री Amazon India वरून आजपासून सुरू झाली आहे. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, ICICI, HDFC आणि SBI बँक कार्डवरून पेमेंट केल्यास 1,500 रुपयांची सूट मिळेल. फोनसोबत 2,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे.