IQOO च्या जबरदस्त 5G फोनवर तब्बल 5000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर

IQOO च्या जबरदस्त 5G फोनवर तब्बल 5000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर
HIGHLIGHTS

IQOO Neo 6 5G च्या किमतीत मोठी कपात

दोन्ही व्हेरिएंट आता तुम्हाला 5 हजार रुपयांनी स्वस्तात मिळणार

12 मिनिटांत फोन 50% पर्यंत चार्ज होतो.

IQOO ने मागील वर्षी IQOO Neo 6 5G स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या या फोनवर तब्बल 5000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे दोन्ही व्हेरिएंट आता तुम्हाला 5 हजार रुपयांनी स्वस्तात मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे नवे दर- 

IQOO Neo 6 5G ची नवी किंमत 

IQOO Neo 6 5G स्मार्टफोन (8GB+128GB) व्हेरिएंट मागील वर्षी 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. तर, (12GB+256GB) व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. मात्र, आता या दोन्ही फोन्सच्या किमतीत 5000 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार, IQOO Neo 6 5G (8GB+128GB) व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये इतकी झाली आहे. तर,  (12GB+256GB) व्हेरिएंटची किमंत 28,999 रुपये इतकी झाली आहे. 

IQOO Neo 6 5G चे स्पेसिफिकेशन्स 

IQOO Neo 6 5G मध्ये 6.62 इंच लांबीचा फुल HD प्लस E4 AMOLED डिस्प्ले मिळेल. यात, 360Hz टच सॅम्पलिंग रेट मिळेल आणि 1300 नीट्स पीक ब्राईटनेससह 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. तसेच, यामध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. इंप्रुव्ड मॅनेजमेंटसाठी लिक्विड व्हेपर चेम्बरदेखील मिळेल. 

तसेच, यामध्ये 4700mAh बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्ज सपोर्ट मिळेल. कंपनीचा असा दावा आहे की, 12 मिनिटांत फोन 50% पर्यंत चार्ज होतो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये USB टाईप C पोर्ट, 5G, 4G LTE आणि Wi-Fi इ. फीचर्स मिळतील. सिक्योरिटीसाठी यामध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. 

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा आहे. 64MP सॅमसंग GW1P सेन्सरसह 8MP वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला गेला आहे. आकर्षक सेल्फीसाठी यामध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo