प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने नुकतेच भारतात iQOO Neo 10R 5G फोन भारतात लाँच केला आहे. त्यानंतर आज या फोनची पहिली विक्री भारतात सुरू होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलमध्ये अनेक ऑफर्ससह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. या अल्ट्रा स्लिम स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे. तसेच, यात फोटोग्राफी आणि पॉवरफुल गेमिंगसाठी भारी फीचर्स मिळणार आहेत. जाणून घेऊयात iQOO Neo 10R फोनची किंमत, ऑफर्स आणि संपूर्ण तपशील-
Also Read: Vivo V50e फोनची डिझाईन आणि लाँच टाइमलाईन Leak! आधीच्या फोनपेक्षा जबरदस्त असेल का कॅमेरा?
iQOO Neo 10R 5G स्मार्टफोनची विक्री आज म्हणजेच 19 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येईल. पहिल्या सेलमध्ये फोनवर 2000 रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट दिली जाईल.
iQOO Neo 10R फोनची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. त्याबरोबरच, 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 28,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, फोनचे टॉप मॉडेल 30,999 रुपयांना आले आहे. यात 12GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. हे मूननाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
iQOO Neo 10R 5G मध्ये 6.78-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात 32MP कॅमेरा आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 6400mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगसह येईल.
महत्त्वाचे म्हणजे, 144Hz रिफ्रेश रेट गेमिंग अनुभवात आणखी वाढ करतो. तर, 6K व्हेपर-चेंबर कूलिंग सिस्टम फोनला विस्तारित सत्रांदरम्यान जास्त गरम होण्यापासून रोखते. ज्यामुळे ते गेमिंग उत्साही लोकांसाठी एक उत्तम डिव्हाइस बनते.
iQOO Neo 10R अनेक जबरदस्त फीचर्ससह येतो, परंतु त्यात एक लक्षणीय कमतरता आहे. ती म्हणजे धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68/ IP69 रेटिंगचा अभाव आहे. त्याऐवजी हा फोन IP65 रेटिंगसह येतो, जे स्प्लॅश आणि धूळपासून बेसिक प्रोटेक्शन तर नक्कीच देईल. परंतु काही स्पर्धकांमध्ये आढळणाऱ्या पूर्ण पाण्याच्या प्रतिकारापेक्षा हे कमी आहे. मात्र, बहुतेक वापरकर्त्यांसाठी दैनंदिन वापरासाठी IP65 रेटिंग पुरेसे असावे.