स्मार्टफोन ब्रँड iQoo च्या फ्लॅगशिप सीरीज 9 मध्ये आणखी एक स्मार्टफोन समाविष्ट झाला आहे. कंपनीने नुकतेच भारतात iQoo 9T 5G लाँच केले आहे. iQoo 9T 5G Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि Vivo च्या V1+ इमेजिंग चिपद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 4,700mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.
हे सुद्धा वाचा : Noise : तब्बल 50 तासांपर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह नवीन इयरबड्स लाँच, किंमतही खूपच कमी
iQoo 9T 5G Android 12 आधारित Funtouch OS 12 सह येतो. फोनमध्ये 6.78-इंच लांबीचा फुल HD + E5 AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,080 x 2,400 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. डिस्प्लेमध्ये 1500 निट्सची पीक ब्राइटनेस देखील आहे. Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि Vivo ची V1+ इमेजिंग चिप फोनमध्ये समर्थित आहे. फोनमध्ये 256 GB UFS 3.1 स्टोरेज असून 12 GB पर्यंत LPDDR5 रॅम आहे.
iQoo 9T 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, जो 50-मेगापिक्सेल ISOCELL GN5 प्रायमरी सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS सपोर्टसह येतो. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
iQoo 9T 5G 4,700mAh बॅटरी आहे, जी 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, ही केवळ 8 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, iQoo 9T 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, NFC, GPS/ A-GPS, FM रेडिओ, USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि E-compass साठी सपोर्ट आहे.
हा फोन 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 8 GB रॅम सह 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटसह 12 GB रॅमची किंमत 59,999 रुपये आहे. iQoo 9T 5G अल्फा आणि लीजेंड कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
iQoo 9T 5G कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करता येईल. ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डने खरेदी करण्यावर 4,000 रुपयांची सूट देखील मिळेल.